Menu Close

कराड आणि वडूज येथेही पोलीस अन् प्रशासन यांना निवेदन

राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम

karad_police_nivedan
निवेदन स्वीकारतांना वडूज येथील पोलीस निरीक्षक
karad_rashtradwaj_nivedan
कराड येथे नायब तहसीलदारांना (मध्यभागी) निवेदन देतांना राष्ट्राभिमानी

कराड : राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी येथील नायब तहसीलदार मीनल भामरे, कराड तालुका ग्रामीण पोलीस, कराड शहर पोलीस, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नागरिकांचे प्रबोधन व्हावे, यासाठी समितीने सिद्ध केलेली राष्ट्रध्वजाचा मान राखा ही विशेष चित्रफीत चित्रपटगृहे आणि केबलवाहिन्या यांना दाखवण्यास अनुमती द्यावी, अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे श्री. सोमनाथ वेदपाठक, श्री. अनिल कडणे, श्री. चिंतामणी पारखे, हिंदु एकताचे श्री. सुहास बाबर, भाजपचे श्री. गणेश कापसे आणि कराड गोरक्षक प्रमुख श्री. गोरख शिंदे उपस्थित होते. वडूज येथील पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांनाही याच विषयाच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *