Menu Close

देशातील शंभर कोटी हिंदूंनी बांगड्या भरलेल्या नाहीत, हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे – शिवसेना

samanaमुंबई – ‘हिंदूंनो, कश्‍मीर सोडा नाही तर मरा‘ अशी धमकी देणाऱ्या जिहाद्यांच्या पार्श्‍वभागावर लाथा मारून त्यांना पाकिस्तानात पिटाळून लावायला हवे. देशातील शंभर कोटी हिंदूंनी बांगड्या भरलेल्या नाहीत हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. कश्‍मीरातील हिंदूंचे निर्दालन रोखण्यासाठी हे करावेच लागेल!‘, अशा शब्दांत जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थितीबद्दल शिवसेनेने सामना‘च्या अग्रलेखातून भाष्य केले आहे.

या अग्रलेखात म्हटले आहे की, हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हाण वानी ठार झाल्यानंतर जम्मू-काश्‍मीर जळत आहे. दहशतवादी संघटनांनी काश्‍मीरमध्ये एकही हिंदू अथवा काश्‍मिरी पंडित दिसता कामा नये, अशी प्रतिज्ञाच जणू त्यांनी घेतली आहे.

राज्यात आणि केंद्रात आपल्या विचारांचे सरकार आल्यामुळे आपल्याकडे आता कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, अशी अपेक्षा कश्‍मिरी पंडितांनी बाळगली असणार. मात्र कश्‍मीरात उलटेच घडते आहे आणि दुर्दैवाने देशातील हिंदू या धमक्‍यांविरुद्ध उसळताना दिसत नाहीत. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या या देशात तब्बल शंभर कोटी लोक हिंदू आहेत हे ऐकायला आणि वाचायला नेहमीच बरे वाटते. तथापि या देशातील मुठभर मुसलमान कुठल्याही खतऱ्यात नसतानाही ‘इस्लाम खतरे में‘ची बांग देत आपली जशी एकजूट दाखवतात, ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात तसे संख्येने शंभर कोटी असूनही हिंदू धर्मीय मात्र कधी आपले तळपते तेज दाखवताना दिसत नाहीत‘. तसेच देशातील शंभर कोटी हिंदूंनी बांगड्या भरलेल्या नाहीत, हे दाखवून देण्याची वेळ आली असल्याचेही म्हटले आहे.

स्त्रोत : सकाळ

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *