हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा चळवळ
कोची (केरळ) : प्लॅस्टिकचे ध्वज वापरणे, तोंडवळ्यावर राष्ट्रध्वज रंगवणे, राष्ट्रध्वजासारखे कपडे परिधान करणे इत्यादी अयोग्य कृतींमुळे राष्ट्रध्वजासह राष्ट्राचाही अवमान होतो. हा अवमान थांबवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने सतर्क राहून प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि श्री बालाजी धर्मजागृती समिती यांच्या वतीने विविध शाळांमध्ये आयेजित केलेल्या प्रबोधनपर व्याख्यानांमध्ये विद्यार्थ्यांना करण्यात आले. या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने एरनाकुलम् येथील श्री सरस्वती विद्यानिकेतन, एसीएस्. हायर सेकंडरी स्कूल, टेरेसा स्पिनेल्ली पब्लिक स्कूल आणि सी.के.सी.एल्.पी. स्कूल, पोन्नुरुन्नी या शाळांमधे प्रबोधन करण्यात आले. या प्रबोधनाचा लाभ ४ सहस्र विद्यार्थ्यांनी घेतला.
क्षणचित्र : शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांना क्रांतीकारकांचे नावेही माहीत नसल्याचे लक्षात आले. (केरळमध्ये डावे अधिक काळ सत्तेत राहिले, तसेच काँग्रेसनेही सत्ता उपभोगली. त्याचाच हा परिणाम आहे ! काँग्रेसमुक्त भारताबरोबरच कम्युनिस्टमुक्त भारतची घोषणाही देणे आवश्यक आहे, हे यातून दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात