धनाच्या त्यागाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची संधी दवडू नका !
मुंबई : देवनार दत्ताराम गणपत पाटील इस्टेट, सायन ट्रोम्बे येथील मातोश्री विद्यामंदिर या शाळेत ९ ऑगस्ट या दिवशी क्रांतीदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांचे सचित्र प्रदर्शन लावण्यात आले होते. इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. प्रदर्शनातील क्रांतीकारकांची सर्व माहिती, जन्म-मृत्यू यांच्या नोंदीही त्यांनी करून घेतल्या. प्रदर्शन लावल्यविषयी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उज्ज्वला सांडभोर यांनी समितीचे आभार मानले.
या वेळी समितीचे श्री. मयुरेश कोनेकर आणि सनातनच्या सौ. नयना भगत उपस्थित होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात