सरताज अझिज
इस्लामाबाद – भारत-पाक यांच्यात होणार्या परराष्ट्र सचिव स्तरावरील बैठकीकडून अवास्तव अपेक्षा बाळगू नका, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे सल्लागार सरताज अझिज यांनी म्हटले आहे. २५ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाकला भेट दिली होती.
या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव १४ आणि १५ जानेवारी या दिवशी चर्चा करणार आहेत. या संदर्भात अझिज यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या धावत्या भेटीवर नुकतेच पाकच्या संसदेत निवेदन सादर केले. या वेळी अझिज म्हणाले, या चर्चेत अनेक प्रकारचे निर्णय समाविष्ट असल्याने ही चर्चा आव्हानात्मक आहे. काही सूत्रांवर प्रगती झाली असून आणखी काही विषयांमध्ये प्रगती अपेक्षित आहे. मोदी यांची पाकभेट चांगला संकेत होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात