Menu Close

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम !

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत, तसेच राष्ट्रध्वज पायदळी तुडवले जाऊ नयेत, या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्रात ठिकठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना, तसेच राष्ट्राभिमानी नागरिक यांच्या वतीने देण्यात आले. याविषयीचा सविस्तर वृत्तांत येथे देत आहोत.

कोल्हापूर

राष्ट्राभिमान्यांकडून कोल्हापूर येथील निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन !

कोल्हापूर : प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत, राष्ट्रध्वज पायदळी तुडवू नयेत, या मागणीचे निवेदन येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शंकर बर्गे यांना ५ ऑगस्टला देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सर्वश्री संभाजी भोकरे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, श्री शिवप्रतिष्ठानचे राहुल नागटिळक, बजरंग दलाचे सुधाकर परमणी, वंदे मातरम् युथ ऑर्गनायझेशनचे अवधूत भाट्ये, युवा सेनेचे भाऊ चौगुले, हिंदु एकता आंदोलनाचे शिवाजीराव ससे, आशिष लोखंडे, शिवसेनेचे भुदरगड तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनराज घाडगे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेच्या साधिका यांसह अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.

राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी ३ शाळांतील मुख्याध्यापकांना निवेदन सादर !

kerle_rashtradhwaj_nivedan
हनुमान हायस्कूलचे मुख्याध्यापक निवेदन स्वीकारतांना

केर्ले : येत्या १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत, राष्ट्रध्वज पायदळी तुडवू नयेत, या राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या मोहिमेच्या अंतर्गत येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांनी येथील श्री हनुमान हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप गायकवाड, कुमार विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री. गोसावी आणि कला विद्यामंदिराचे मुख्याध्यापक यांना ८ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि श्री चंद्रकांत मारुति पाटील दादा कला क्रीडा शैक्षणिक आणि सांस्कृतिक युवा मंच यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी धर्माभिमानी रामभाऊ मेथे, रणधीर किल्लेदार, दीपक नलावडे, सागर कोळी, संदीप पाटील, विक्रम माने, अविनाश पोवार, आकाश भोसले, पंकज कालगे, विश्‍वजीत बुवा, विजय मोरे, ऋतवीन पोवार, अजित पाटील उपस्थित होते. या वेळी हनुमान हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप गायकवाड म्हणाले की, हा उपक्रम चांगला आहे. शाळेच्या लाभासाठी असे उपक्रम राबवणे आवश्यक आहे. आम्ही विद्यार्थ्यांना प्लास्टिकचे राष्ट्रध्वज न वापरण्याविषयी सांगतो.

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री आणि खरेदी करणार्‍यांवर कारवाईचे पोलीस आणि प्रशासन यांचे आश्‍वासन

malkapur_nivedan
पोलीस निरीक्षक यांना निवेदन देतांना धर्माभिमानी

मलकापूर : राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी समितीच्या वतीने येथील तहसीलदार श्री. चंद्रशेखर सानप आणि पोलीस निरीक्षक श्री. अनिल गाडे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. समितीच्या वतीने कोल्हापूर येथे प्रशासन, शाळा आणि महाविद्यालये अशा १४ ठिकाणी निवेदन देण्यात आले.

तहसीलदार श्री. चंद्रशेखर सानप आणि पोलीस निरीक्षक श्री. अनिल गाडे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरणारे आणि खरेदी करणारे यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेे आश्‍वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेच्या साधिका उपस्थित होत्या.

शाहूवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. ओवूळकर यांनी शाळेतील २५० विद्यार्थिनींना धर्मशिक्षण मिळण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता या विषयावर व्याख्यान घेण्याची मागणी केली.

पुणे

विविध प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन

pune_rashtradwaj_nivedan
उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना निवेदन देतांना कार्यकर्ते

पुणे : पुणे जिल्हाधिकारी, पुणे पोलीस आयुक्त आणि पिंपरी-चिंचवड येथील पोलीस परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याविषयी निवेदन देण्यात आले.

येथील पुणे पोलीस आयुक्तांच्या वतीने विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी ते म्हणाले की, यंदाच्या वर्षी राष्ट्र्रध्वजाचा मान राखण्यासाठी निश्‍चितपणे अंमलबजावणी करू. त्या संदर्भात सर्व पोलीस ठाण्यांना सूचनाही देणार आहोत. या वेळी निवेदन देतांना समितीचे सर्वश्री कृष्णाजी पाटील, शशांक सोनवणे उपस्थित होते. पुणे जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी पुरंदर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. दिलीप विठ्ठल गिरमे, पुरंदर तालुक्याचे युवा काँग्रेसचे श्री. सचिन जाधव, समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आणि अन्य राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.

पालघर

बोईसर येथील राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून पालघर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

पालघर : स्वातंत्र्याच्या काळात शिरीषकुमार याने छातीवर गोळी झेलली; मात्र हातातील राष्ट्रध्वज खाली पडू दिला नाही. स्वतंत्र भारतात मात्र कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज इतरत्र पडलेले आढळतात. राष्ट्रध्वजाचे अशा प्रकारे होणारे विडंबन रोखण्यासाठी बोईसर येथील राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून ११ ऑगस्ट या दिवशी पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांना निवेदन देऊन राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आवाहन करण्यात आले. निवेदन देतांना श्री. नाईकगुरुजी, श्रीमती मालती सोनार उपस्थित होत्या.

धुळे

धुळे येथील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन उपजिल्हाधिकार्‍यांचा कृतीशील प्रतिसाद

dhule_rashtradwaj_nivedan
जिल्हाधिकारी श्री. अण्णासाहेब मिसाळ यांना निवेदन देतांना

येथील जिल्हाधिकारी श्री. अण्णासाहेब मिसाळ यांना निवेदन देण्यात आले. या वेळी स्वदेशी जागरण मंचचे श्री. विलास राजपूत, भाजपचे श्री. प्रतीक गीते आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल उपस्थित होते. यानंतर उपजिल्हाधिकारी श्री. तुकाराम हुळवले यांनीही समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा याविषयी चित्रफीत पाहून उपक्रमाचे कौतुक केले, तसेच कृती समितीत हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सहभागी करून घेण्यात नियोजन करता येईल, असे सांगितले. केबल चालकांची बैठक घेऊन त्यांना ही चित्रफीत दाखवण्याचेही त्यांनी नियोजन केले.

रायगड

व्यापक स्तरावर प्रबोधन

पनवेल : रायगड जिल्ह्यात ४० शाळा, २ महाविद्यालये आणि ३ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. १८ शाळांमधून विद्यार्थ्यांचेही राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक कार्यक्रमाची माहिती मुलांना सांगण्यासाठी या, असे सांगितले, तर उलवा (ता. उरण) येथील शाळेत विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांचे शिक्षण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. २ शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलांना राष्ट्र-धर्माचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने साप्ताहिक सनातन प्रभात चालू केले.

क्षणचित्र : या मोहिमेत रायगड जिल्ह्यातील ८ धर्माभिमान्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *