भारतीय सैन्याचा राष्ट्रघातकी निर्णय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कटक – अल्-कायदा या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून येथे अटक करण्यात आलेल्या अब्दुल रेहमान या आतंकवाद्याला पाकमध्ये परत पाठवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील चकन-द-बाग येथून रेहमानला पाकमध्ये पाठवण्यात आले. भारतीय सैन्यदलाने मानवतेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलले आहे, असे संरक्षण खात्याच्या जनसंपर्क अधिकार्याने सांगितले. (आतंकवाद्याशी मानवतेच्या दृष्टीकोनातून वागणार्या भारतीय सैन्यदलाने आतंकवाद्यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून व्यवहार केल्याचे कधी अनुभवले आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ३७ वर्षीय रेहमान कटक शहराच्या बाहेर एक मदरशा चालवत होता. रेहमान याला अटक झाल्यानंतर तिसर्याच दिवशी त्याची बेकायदा मदरशा बंद करण्यात आली. रेहमानच्या नावावर तीन बँक खाती होती. या बँक खात्यांमध्ये विदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा जमा व्हायचा आणि रेहमान थोडे थोडे करून हे पैसे काढून घ्यायचा. रेहमान हा अल्-कायदासाठी भरती प्रक्रिया राबवायचा, अशी माहिती उत्तरप्रदेशमध्ये अटक करण्यात आलेल्या महंमद आसिफ या आतंकवाद्याने दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात