शास्त्रोक्त पद्धतीच्या गणेशमूर्तींतूनच गणेशतत्त्वाचा लाभ होतो, हे हिंदूंना कसे कळणार ? यासाठी धर्मशिक्षण देणारे हिंदु राष्ट्रच स्थापायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : यंदा गणेशोत्सवानिमित्त शहर आणि परिसरातील चौकाचौकांमध्ये श्री गणेशमूर्ती विक्री केंद्र उभारली आहेत. बालगणेश आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांमुळे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या वेषातील श्री गणेशमूर्ती बाजारात तेथे विक्रीसाठी आल्या आहेत. (गणेशाच्या मानवी रूपातील मूर्तींच्या मागणीला धर्मशिक्षणाचा अभावच कारणीभूत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या वेशातील गणेशमूर्तींना विशेष मागणी असून त्या आणि बालगणेशाच्या मूर्ती यांसाठी नागरिकांनी आगाऊ पैसे दिले आहेत.
श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या रूपातील श्री गणेशमूर्ती २ ते ६ फूट या आकारांमध्ये उपलब्ध आहेत. बालगणेशाच्या मूर्तीमध्ये उंदीर किंवा मोर यांच्यावर बसलेला गणपति, तसेच फुटबॉल खेळणारा गणपति असेही विविध प्रकार उपलब्ध आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात