ठाणे : हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांमुळे शासनाला राष्ट्रध्वजाविषयीचा अध्यादेश काढावा लागला. समितीचे कार्य चांगले आहे. समितीने सिद्ध केलेली राष्ट्रध्वजाचा मान राखा ही चलचित्रफीत आम्ही पुढेही दाखवू, असे प्रतिपादन तहसीलदार करमणूककर अधिकारी श्रीमती अंजली पवार यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली, तेव्हा त्या बोलत होत्या. या वेळी त्यांना राष्ट्रध्वजाचा मान राखा ही ध्वनीचित्रफीतही दाखवण्यात आली. राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयीचे निवेदन येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती फरोग मुकादम यांना देण्यात आले.
या वेळी समितीच्या सौ. सुनीता पाटील, तसेच धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी सौ. अंजली रायकर, सौ. सीमा कापडे आणि सनातन संस्थेचे श्री. कोंडिबा जाधव उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे, असे सांगून श्रीमती फरोग मुकादम यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात