देशप्रेमी नागरिकांनो, राष्ट्रपुरुषांचा अवमान कधीपर्यंत सहन करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई – गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात गायलेल्या एका गाण्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, तसेच आगरकर आणि गांधी यांचा अवमान केला आहे. गांधी, सावरकर, ते टिळक, आगरकर, आले गेले किती शंभर, सुटाबुटात शोभून दिसतोय, भीमराव सार्यांत ऐक नंबर… असे या गाण्याचे आरंभीचे बोल आहेत.
या गाण्यात बाबासाहेबांचे गुणगान करतांना सावरकर आणि टिळक यांना हीन लेखले गेले आहे. त्यामुळे समाजातून याला मोठ्या प्रमाणात विरोध चालू झाला असून अशा प्रकारे तुलना केल्याने देशप्रेमी नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. २ सहस्र ५०० हून अधिक प्रेक्षकांनी या व्डिडिओला डिसलाइक (नाकारले) केले आहे. आनंद आणि आदर्श शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवणार्या २५० प्रतिक्रियाही व्हिडिओखाली प्रसारित करण्यात आल्या आहेत. व्हॉट्स अॅपवरूनही या गाण्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात प्रचार चालू असून हे गाणे डिसलाइक करण्याचे आवाहन केले जात आहे.
व्हॉट्स अॅपवरून या गाण्याला डिसलाइक करणारे आवाहन
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात