Menu Close

एर्नाकुलम् (केरळ) येथील मंदिरात लव्ह जिहादचा प्रयत्न !

लव्ह जिहाद काय आहे, हे माहीत नसणारे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही घटना जाणून घ्यावी ! –

Love_jihad_M

एर्नाकुलम् (केरळ) : येथील मंदिरात महाप्रसादाच्या वेळी काही मुसलमान युवक येत असल्याने तेथे लव्ह जिहादचा धोका निर्माण झाला आहे.

या मंदिरामध्ये प्रतिदिन दुपारी महाप्रसाद असतो. मंदिरात महाप्रसाद ग्रहण करण्याच्या निमित्ताने येणारी मुसलमान मुले हिंदु मुलींशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतात. नुकतीच या मंदिरात अशा प्रकारची एक घटना घडली. मंदिरात महाप्रसाद घेण्याच्या निमित्ताने आलेला मुसलमान युवक (अंदाजे २२ वर्षीय) हिंदु मुलीशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत होता. मंदिर व्यवस्थापनाच्या सदस्यांना संशय आल्याने त्यांनी त्या मुलाला नाव आणि गाव विचारले. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर देवस्थानच्या सदस्यांनी त्या युवकाला तेथून निघून जाण्यास सांगितले. एका हिंदु युवकासमवेत ४ मुसलमान युवक मंदिरात आले होते. यातील एक मुसलमान युवक हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता.

काही धर्माभिमान्यांनी मंदिरातील त्या प्रसंगाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या मंदिरात महाप्रसादानाच्या वेळी मुसलमान आणि ख्रिस्ती मुले येत असल्याचे मंदिर व्यवस्थापनाच्या सदस्यांनी सांगितले. मंदिराच्या प्रवेशद्वारावर अहिंदूंना प्रवेश नाही असा फलक लावण्याची सूचना धर्माभिमान्यांनी मंदिर व्यवस्थापनाला केली. या भागात लव्ह जिहादची प्रकरणे घडत असल्याचे मंदिर व्यवस्थापनाच्या सदस्यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *