Menu Close

हिंदु धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

rajashri_tiwari
मार्गदर्शन करतांना सौ. राजश्री तिवारी

धाराशिव : हिंदु समाजाला धर्मशिक्षण दिले जात नसल्याने समाज आज पाश्‍चात्त्य संस्कृतीकडे झुकला आहे. जुन्या रूढी-परंपरा यांच्यापासून तो पुष्कळ दूर गेला आहे. अशा परिस्थितीत हिंदु धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी केले. हिंगणगाव (तालुका परांडा) येथील हनुमान मंदिरात १४ ऑगस्ट या दिवशी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या.

सौ. तिवारी यांचा सत्कार हिंगणगाव येथील सौ. पुष्पा गोरे यांनी केला, तर सरपंच श्री. बळीराम मारकड यांचा सत्कार समितीचे श्री. जगताप यांनी केला. उपसरपंच श्री. सौदागर गोरे यांचा सत्कार श्री. सतीश महाराज गोरे यांनी केला. सभेनंतर धर्माभिमान्यांनी शंकानिरसन करून घेतले, तसेच मोठी सभा आणि धर्मशिक्षणवर्ग यांची मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *