मुंबई : देवनार गोवंडी येथील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गाला येणार्या बाळ मित्र क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. हर्षद खानविलकर यांनी म्हटलेल्या संपूर्ण वन्दे मातरम् मुळे हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम वैशिष्टपूर्ण ठरला. श्री. खानविलकर यांनी संस्कृतमधील संपूर्ण वन्दे मारतम् म्हणून उपस्थितांना त्याचा मराठीत अर्थही सांगितला. स्थानिक मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान टाळण्यासाठी ध्वजारोहणाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज सन्मान पेटी ठेवण्यात आली होती. या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला ६० हून अधिक राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात