हिंदू एक्झीस्टन्स या संकेतस्थळाचे संपादक श्री. उपानंद ब्रह्मचारी यांचे पंतप्रधानांना आवाहन
कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच गोरक्षक हे समाजकंटक आहेत, असे विधान केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदू एक्झीस्टन्स या संकेतस्थळाचे संपादक श्री. उपानंद ब्रह्मचारी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून, गोरक्षकांत शिरलेल्या समाजकंटकांची सूची करण्यासह राजकारणात असलेल्या समाजकंटकांचीही सूची बनवा, असे आवाहन केले आहे.
शासनाच्या भूमिकेमुळे गोहत्या करणार्यांना मोकळे रान मिळणार !
शासनाच्या या भूमिकेमुळे एकीकडे धर्मनिरपेक्ष म्हणवणारे विविध पक्ष गोरक्षकांवरच कारवाई करणार, तर दुसरीकडे गोहत्या करणार्यांना मोकळे रान मिळणार आहे, असे श्री. ब्रह्मचारी यांनी निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान असे म्हणतात, पशूवधगृहांपेक्षा अधिक गायी प्लास्टिक पोटात गेल्याने मृत्यू पावतात. वास्तविक गायी रस्त्यावरील प्लास्टिक खातात, यातून गोमातांच्या चार्याचा प्रश्न आणि प्लास्टिकच्या कचर्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न समोर येतो. हे दोन्ही प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. शासन पशूवधगृहांना अनुमती देते, शासकीय अनुदान देते, गोमांस निर्यातीत जगभरात प्रथम स्थान मिळवते आणि गोरक्षकांना गुंड संबोधते हा दुर्दैवी विरोधाभास आहे.
गोरक्षक प्रशांत पुजारी यांची निर्घृण हत्या करणार्या धर्मांधांना शिक्षा होणार का ?
श्री. उपानंद ब्रह्मचारी यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे, पंतप्रधान यांनी गोरक्षकांविषयी केलेल्या विधानानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने एक परिपत्रक काढून गोरक्षकांविरुद्ध फौजदारी दंड विधानाच्या कलम ३९ नुसार कारवाई करण्याच्या सूचना राज्यसरकारांना दिल्या आहेत; मात्र त्याचबरोबर जे गोवंशाची हत्या करतात, तस्करी करतात, त्यांचा पाठलाग करणार्या पोलिसांवर गोळीबार करतात, अशा समाजकंटकांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले नाहीत, याविषयी खेद वाटतो. गोहत्या रोखण्यासाठी देशात काही ठिकाणी अप्रिय घटना घडल्याही असतील; मात्र त्याच्या गदारोळात कर्नाटकमधील गोरक्षक प्रशांत पुजारी याची धर्मांधांनी गोरक्षा संबंधातच निर्घृण हत्या केली, त्याचा आक्रोश पंतप्रधानांना ऐकू गेला नसावा, तसेच गोहत्येचा कायदा धाब्यावर बसवून अत्यंत क्रूरपणे गोहत्या करून त्यांचे मांस, हाडे, सांगाडे भर सार्वजनिक ठिकाणी टाकून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, त्या हिंदूंचा आक्रोशही पंतप्रधानांच्या कानी पडला नसावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात