सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागातील शेतामध्ये आणि वनखात्याच्या जागेत अवैधरित्या पशूवधगृह चालू असून ते त्वरित बंद करावे, अशी मागणी श्रीराम सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. अवैध पशूवधगृहे बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी या वेळी देण्यात आली.
जिल्ह्यात ठिकठिकाणी क्रूरपणे रातोरात सहस्रो गोवंशियांची हत्या होत आहे. त्यामुळे गाव बाजारात होणार्या पशूखरेदी-विक्रीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे, पशूंना बळी देण्यास आणि अवैध खरेदी-विक्रीला आळा घालण्यात यावा आदी मागण्याही या वेळी करण्यात आल्या. निवेदन देतांना श्रीराम सेनेचे गोरक्षाप्रमुख सुधीर बहिरवाडे, संयोजक सिद्धाराम नंदरगी, मृणाल कांबळे, सूरज साळुंखे, सिद्धाराम गुरदोळ्ळी, मोहन नुन्ना आदी उपस्थित होते. अवैधरित्या गोवंशियाची वाहतूक करणार्यांना श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पोलिसांच्या कह्यात दिले आहे. या प्रकरणी गोरक्षकांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. (गोरक्षकांना विनाकारण अपर्कीत करून गोहत्या करणार्यांचे समर्थन करणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? कायद्याचे उल्लंघन करणे आणि ठार मारण्याची धमकी देणे ही त्यांच्या दृष्टीने सहिष्णुता म्हणायची का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात