हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनांना अन्य ठिकाणी अनुमती मिळते; मात्र सातारा येथे नाकारली जाते, हा अजब न्याय नव्हे का ? कायदा सर्वत्र सारखा असतांना अनुमती नाकारली जाणे, हा अन्याय नव्हे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात, दैनिक सनातन प्रभात
सातारा : सनातनवरील अन्याय्य कारवाईच्या निषेधार्थ समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने सातारा येथे २० ऑगस्ट या दिवशी अजिंक्य गणेश मंदिरासमोर आंदोलन करण्यात येणार होते. १९ ऑगस्ट या दिवशी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी रात्री ८ वाजता अनुमती पत्र ठेवून घेतले आणि अनुमती देतो, असे सांगितले; मात्र रात्री १० वाजता अचानक एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पदाधिकार्यास दूरभाष करून ही अनुमती नाकारल्याचे सांगितले. २० ऑगस्ट या दिवशी परत एकदा अनुमती मागण्यासाठी गेल्यावर तुम्हाला आंदोलनास अनुमती नाकारली आहे, असे सांगत हिंदु महासभेचे कार्यकारिणी सदस्य श्री. उमेश गांधी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांना पोलिसांनी १४९ ची नोटीस दिली. (एखाद्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करणे, हा प्रत्येकाला लोकशाहीने दिलेला मूलभूत अधिकार आहे, हे पोलीस जाणत नाहीत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२० ऑगस्ट या दिवशी अनुमती नाकारतांना पोलिसांनी अंनिसचे लोक अनुमती मागण्यासाठी अगोदर आले होते. त्यामुळे तुम्हाला आता अनुमती देता नाही, असे हास्यास्पद कारण सांगितले. यानंतर पोलिसांनी तुम्ही आंदोलन केल्यास आणि काही गडबड केल्यास तुम्हाला उत्तरदायी धरू. तुम्ही आज ऐवजी उद्या आंदोलन घ्या, असेही सांगितले. (हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनाच्या वेळी गडबड झाल्याची आतापर्यंत एकही घटना घडलेली नसतांना नाहक अनुमती नाकारणारे पोलीस जनतेला न्याय काय देणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या आंदोलनात श्रीशिवप्रतिष्ठान, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, हिंदु महासभा, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, तसेच अन्य समविचारी संघटना सहभागी होणार होत्या.
सनातनवरील अन्यायाच्या निषेधार्थ आंदोलन २१ ऑगस्ट या दिवशी घेण्यात येणार आहे. त्यामध्ये वरील हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी होतील.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात