- उघडपणे गोहत्या करणारे कसाई आणि गोतस्कर यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही; मात्र गोरक्षण करणार्या गोरक्षकांना कारागृहात टाकले जाते, ही शासन आणि पोलीस यांची मोगलाई नव्हे का ?
- आम्ही गोरक्षण करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही, अशा वृत्तीचे शासन !
- स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरही गोरक्षक, हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर शासनकर्त्यांकडून अत्याचार चालूच आहेत. यावरून हिंदूंना ६९ वर्षांनंतरही योग्य शासनकर्ता निवडता आला नाही, असेच म्हणावे लागेल ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !
- अमली पदार्थांची तस्करी करणार्यांना सोडून गोरक्षकांवर कारवाई करणारे अकाली दल-भाजप सरकारचे भ्रष्ट आणि हिंदुद्वेषी पंजाब पोलीस ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पटियाला (पंजाब) : पंजाब गोरक्षक दलाचे प्रमुख श्री. सतीशकुमार प्रधान यांना २१ ऑगस्ट या दिवशी पटियाला पोलिसांनी अटक केली. (पंजाबमध्ये अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात चालू आहे. पंजाबमधील नागरिक या तस्करांवर कारवाई करण्याची मागणी करत असतांना निष्क्रिय रहाणारे भ्रष्ट पंजाब पोलीस गोरक्षकांवर मात्र तातडीने कारवाई करत आहेत. पंजाबमध्ये लवकरच होणार्या निवडणुकीत हिंदूंनी आणि गोरक्षकांनी याचा निषेध मतपेटीतून दिला पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) सामाजिक संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या संघटनेचे सदस्य काही गो-तस्करांना मारहाण करतांना दिसत असल्याने त्यांच्यावर अपहरण आणि लोकांना त्रास देणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत.
काही गो-तस्करांनी श्री. सतीशकुमार प्रधान यांनी त्यांना डांबून ठेवले, लुबाडले, शारीरिक मारहाण केली आणि अनैसर्गिक संभोग केला, असे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांकडून श्री. सतीशकुमार यांच्यावर या संदर्भातील गुन्हेही नोंदवण्यात आले. श्री. सतीशकुमार यांच्यावर ८ ऑगस्ट या दिवशी गुन्हे नोंदवण्यात आल्यावर तेव्हापासून ते फरार होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ८० टक्के गोरक्षक समाजकंटक असल्याचे म्हटल्यानंतर श्री. सतीश कुमार यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला होता.
पंजाब गोरक्षा दलाचे प्रमुख श्री. सतिशकुमार प्रधान यांच्या अटकेचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निषेध !
गोरक्षकांवर कारवाई आणि कसायांना मोकळे रान, हा हिंदूंवर अन्याय ! – हिंदु जनजागृती समिती
हिंदूंसाठी पूजनीय असणार्या गोमातेची हत्या करणार्या कसायांना मोकळे रान आणि स्वतःच्या धार्मिक श्रद्धांचे रक्षण करणार्या गोरक्षकांवर अन्यायकारक कारवाई हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे. पंजाब गोरक्षा दलाचे प्रमुख श्री. सतिशकुमार प्रधान यांना झालेली अटक हा त्यातीलच एक प्रकार आहे. हिंदुबहुल भारतात हिंदूंच्या धर्मश्रद्धांचा हा अपमान आहे. त्यामुळे शासनाने या भूमिकेचा पुनर्विचार करावा आणि गोरक्षकांविषयीची आकसाची भूमिका सोडून द्यावी अन्यथा देशभरात गोरक्षकांच्या समर्थनार्थ जनआंदोलन उभे राहील, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,
१. देशात हिंदुत्ववादी विचारांचे शासन आले असेल, तरी अनधिकृत पशूवधगृहे, गोमातेची अवैध वाहतूक, गोहत्या, गोमांस निर्यात यांपैकी कशावरही बंदी नाही.
२. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भारतातील गुलाबी क्रांती (पिंक रिव्हॉल्यूशन) रोखण्याचे आश्वासन सत्ताधारी भाजपने दिले होते. प्रत्यक्षात भारतातून परदेशात गोमांसाची निर्यात वाढल्याची आकडेवारी समोर येत आहे.
३. गोतस्कर आणि कसाई यांच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलीस त्यांना संरक्षण देऊन वैध मार्गाने कार्य करणार्या गोरक्षकांवरच खोटे गुन्हे दाखल करत असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.
४. काँग्रेस शासनाच्या काळात घडणारे हे प्रकार हिंदुत्ववादी विचारांचे शासन येऊनही बंद झालेले नाहीत, हे दुर्दैवी आहे.
५. गाय दूध देते, मत देत नाही, या नव्या विचारसरणीनुसार शासन गोरक्षकांवर अन्याय करत असेल, तर ते संतापजनक आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावनांचा आदर करून शासनाने श्री. सतिशकुमार प्रधान यांच्याविरुद्ध नोंदवलेले गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांची सुटका करावी आणि गोमातेचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात