Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्यक्तीमत्त्व विकास आणि गुणसंवर्धन याविषयी बी.एड्.च्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन

smita_navlkar
विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना सौ. स्मिता नवलकर

नवी मुंबई : व्यक्तीची ओळख तिच्यातील गुण आणि दोष यांमुळे होते. सद्गुणी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते, तर दुर्गुणांचा स्वत:ला आणि इतरांना त्रास होतो. मानसिक तणावापासून दूर रहायचे असेल, तर व्यक्तीमत्त्व विकास होणे आवश्यक आहे. व्यक्तीमत्त्व विकास होण्यासाठी स्वभावदोष अन् अहं निर्मूलन यांविना पर्याय नाही, असे प्रतिपादन सौ. स्मिता नवलकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ ऑगस्ट या दिवशी खारघर येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वुमेन्स कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड्.च्या विद्यार्थिनींना व्यक्तीमत्त्व विकास आणि गुणसंवर्धन या विषयावर मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

या मार्गदर्शनाच्या वेळी प्राध्यापकही उपस्थित होते. या शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सोनकांबळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक श्री. साठे आणि अन्य प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले. या वेळी सनातन संस्थानिर्मित स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, गुण संवर्धन या विषयांचे ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचा उपस्थितांनी लाभ घेतला. हे ग्रंथ महाविद्यालयाच्या ग्रंथालयात समाविष्ट करून घेणार असल्याचे या वेळी उपस्थित प्राध्यापकांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

  1. नरेश

    मिडिया, मानव अधिकार, महिला अधिकार, बुद्धिजिवी, वरिष्ठ पत्रकार,

    इन सब का दोगला पन देखो और समझो

    कितने खडे हो जाते अगर गौहर की जगह कोई दुसरी हिरोइन या ऐक्ट्रेस होती और थप्पड मारने वाला कोई हिंदु होता तो

    २४ घंटे हंगामा खडा रहता मिडिया मे बडे पैनल लगा डिबेट होते

    सडको पर महिला अत्याचार के खिलाफ धरना होता हर श्याम मोमबत्तीयो की रैलीया होते

    महिला संगठन भागदौड कर कार्यवाही करते पर अब यह सारे सेक्युलर क्यों नही प्रोटेस्ट या हंगामा कर रहे ?

    क्यों की वो मार खाने वाली और मारने वाला सेक्युलर जाती और शांतिप्रिय धर्म से है इसिलिये ?

    लगता है इस देश मे सांप्रदायिक और गलत सिर्फ हिंदु होना ही है?

    नोट : मिडिया को दोगला कहना और देशद्रोही, हिंदु विरोधी होना ही बडी वजह है

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *