पोर्ट ब्लेअर : अंदमानच्या पोर्ट ब्लेअर शहरातील जी.बी. पंत रुग्णालयामध्ये उपचार घेणार्या भाजपच्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी ३ ख्रिस्ती महिला गरीब हिंदु रुग्णांची भेट घेऊन त्यांचे नाव आणि पत्ता लिहून घेत होत्या आणि त्यांना येशू ख्रिस्ताला प्रार्थना करण्यास सांगत होत्या. तसेच त्या महिलाही रुग्णांसाठी येशूला प्रार्थना करत होत्या. त्यानंतर त्या खचलेल्या रुग्णांना भेटकार्ड देऊन चर्चला भेट देण्याची विनंती करत होत्या, अशी माहिती भाजपचे कार्यकर्ते मोहन हलदर यांनी दिली आहे.
ख्रिस्ती धर्माच्या त्या प्रचारक गरीब हिंदु रुग्णांच्या मानसिक स्थितीचा अपलाभ उठवू पहात असल्याचे लक्षात येत होते. अस्थीभंग किंवा इतर साधा आजार झालेल्या रुग्णांचीच या महिला भेट घेत होत्या. खूप गंभीर आजार झालेल्या रुग्णांची त्या भेट घेत नव्हत्या. तसेच त्या वॉर्डमध्ये असलेल्या एका मुसलमान रुग्ण महिलेला येशूविषयी सांगण्याचे धाडस त्यांनी केले नाही. यावरून अल्पशिक्षित आणि गरीब हिंदु रुग्ण त्यांचे लक्ष्य असल्याचे स्पष्ट होते, असे हलदर यांनी सांगितले.
अशाच प्रकारची दुसरी एक घटना अंदमानच्या माया सुंदर येथील डॉ. आर्.पी. रुग्णालयामध्ये २ महिन्यांपूर्वी घडल्याचे दुसर्या एका नागरिकाने सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात