अमरावती येथे हिंदु ऐक्य मेळाव्याचे आयोजन
अमरावती, २२ ऑगस्ट : ३१ ऑगस्टला पूज्यपाद संतश्री आसारामजी बापूंना अटक होऊन ३ वर्षे पूर्ण होत असून अजून त्यांची सुटका झालेली नाही. तसेच साध्वी प्रज्ञासिंग, धनंजय देसाई आणि सनातनचे साधक यांचीही सुटका होत नसल्याने अमरावती शहरात व्यापक आंदोलन व्हायला हवे. तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपण सर्वांनी प्रभु श्रीरामाचे हनुमंत व्हायला हवे, असे प्रतिपादन भगवा सेनेचे श्री. नितीन व्यास यांनी केले. अमरावती येथे २१ ऑगस्ट या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु ऐक्य मेळाव्यात ते बोलत होते.
मेळाव्याला २३ हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह धर्मप्रेमी अधिवक्ते उपस्थित होते. या वेळी हिंदूंवर होणार्या विविध आघातांविषयी चर्चा करण्यात आली. तसेच या संदर्भातील ध्वनीचित्र-चकतीही दाखवण्यात आली. मेळाव्यामध्ये पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू, धनंजय देसाई, साध्वी प्रज्ञासिंह आणि सनातनचे निरपराध साधक यांना मुक्त करण्यात यावे, यासाठी अमरावती शहरात व्यापक स्वरूपातील आंदोलन करण्याचे, तसेच राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी धर्मरक्षक कृती समितीची स्थापना करण्याचे ठरवण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनीही विचार मांडले.
मान्यवरांनी मांडलेले विचार
हिंदु ऐक्य मेळावा ही काळाची आवश्यकता ! – डॉ. सुरेश चिकटे, जिल्हाध्यक्ष, विश्व हिंदु परिषद
हिंदु ऐक्य मेळावा ही काळाची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी या गणेशोत्सवात शहरातील प्रत्येक मंडळामध्ये लव्ह जिहादविषयी माहिती देणारी पत्रके वितरीत करून मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याचा निर्धार करूया.
धर्मावरील आघातांची माहिती देणारे सनातन प्रभात नियमित वाचायला हवे ! – श्री. अनंत गुढे, माजी खासदार, शिवसेना
मी कित्येक वर्षांपासून सनातन प्रभातचा वाचक असून माझ्याजवळ असलेले जुने अंक मी इतरांना वाचण्यासाठी देतो. आज धर्मावरील आघातांची माहिती देणारे सनातन प्रभात प्रत्येकाने वाचायला हवे. तसेच पुढील कार्याचे धोरण आणि दिशा ठरवून त्याप्रमाणे वैध मार्गाने कृती करायला हवी.
हिंदु जनजागृती समितीला शिवसेनेचा अखंड पाठिंबा ! – श्री नरेंद्र केवले, शहरप्रमुख, शिवसेना
हिंदूंवर होणारे आघात रोखण्यासाठी आपल्याला हिंदूंचे सामर्थ्य वाढवायला हवे. त्यासाठी हिंदूसंघटन मेळावा हा स्तुत्य उपक्रम आहे. हिंदु जनजागृती समितीच्या या कार्याला प्रत्येक शिवसैनिकाचे सहकार्य असेल आणि शिवसेनेचा अखंड पाठिंबा राहील.
हिंदू एकत्रित आल्यामुळेच धर्मावरील आघात रोखणे शक्य ! – श्री. सुधीर बोपूलकर, अध्यक्ष, हिंदु हुंकार संघटना
आतापर्यंत घडलेल्या राष्ट्र आणि धर्म विरोधी घटनांमध्ये हिंदु संघटनांनी एकत्र येऊन कार्य केल्यामुळे त्यात यश प्राप्त झाले. यापुढेही संघटित राहून धर्मकार्य करायला हवे.
लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी प्रत्येक हिंदूच्या घरातून धर्माचरण करायला हवे ! – अधिवक्ता प्रतिक पाटील
मला काही कामाच्या अनुषंगाने मुसलमानांच्या घरांत जावे लागते. तेव्हा त्यांच्या घरातील महिला कधीच बाहेर येत नाहीत. आपल्याकडे मात्र कोणीही आले, तरी मुली तोकडे कपडे घालून समोर येतात. प्रत्येक हिंदूच्या घरातूनही धर्माचरण करायला हवे. तसेच पालकांनीही जागरूक राहून मुलींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
हिंदुत्वासाठी सर्वांनी पद, पक्ष, संघटना बाजूला ठेवून एकत्रित यायला हवे ! – श्री. संजय अग्रवाल, मनपा गटनेता, भाजप
धर्मशिक्षणाअभावी हिंदूंची वैचारिक सुंता ! – श्री. अभिषेक दीक्षित, धारकरी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
धर्मशिक्षणाअभावी हिंदू रमजान मासात उपवास करण्यासारख्या चुकीच्या कृती करतात. धर्मशिक्षणाअभावी हिंदूंची वैचारिक सुंता झाली आहे. प्रत्येकाने आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व जाणून घेऊन हिंदु म्हणून जगायला हवे.
भारतामध्ये शासन कोणाचेही असले, तरी संतांचा छळ होणे, ही निंदनीय गोष्ट आहे. – श्री मानव बुद्धदेव, योग वेदांत सेवा समिती
क्षणचित्र
या मेळाव्यास उपस्थित असलेले मठाधिपती श्री. दिलीपबाबू गणोरकर यांनी आमचा मठ हिंदुत्वाचे कार्य करणार्यांसाठी सदैव उपलब्ध राहील, असे सांगितले.