बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अधिवक्ता रवींद्र घोष यांना धर्मांध पोलिसांकडून मारहाण !
- हिंदु महिलेवर बलात्कार, मुलीच्या गुप्तांगात काठ्या खुपसल्या !
- वर्ष २००७ पासून वारंवार अत्याचार !
- पोलिसांकडून घटनेची दखल घेण्यास नकार !
- पीडित आई आणि मुलगी यांचा संरक्षणासाठी आक्रोश !
ढाका : बांगलादेशच्या सत्ताधारी पक्षाच्या धर्मांधांनी बरीसाल जिल्ह्यातील बकेरगंज भागात २९ डिसेंबर या दिवशी एका हिंदु कुटुंबावर आक्रमण करून घरातील महिलेवर बलात्कार केला. याशिवाय या नराधमांनी घरातील एका मुलीच्या गुप्तांगात काठ्या खुपसल्या. याविषयी पीडित महिलेने बकेरगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली असता धर्मांध पोलिसांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. महंमद सईफूल खान, महंमद अराफत इस्लाम अन् त्यांचे साथीदार यांनी हे अत्याचार केले असून ते बांगलादेशमधील अवामी लिग या सत्ताधारी पक्षाचे कायकर्ते आहेत.
त्यानंतर या महिलेने बांगलादेश मायनॉरिटी वॉच (बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडणारी संघटना) या संघटनेकडे कायदेशीर साहाय्यासाठी संपर्क साधला. याविषयी माहिती देतांना पीडिता म्हणाली, माझे पती वारल्यापासून या धर्मांध मुसलमानांकडून वर्ष २००७ पासून आमच्या कुटुंबाचा छळ केला जात आहे.
माझ्यावर आणि माझ्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, बलात्कार केले जात असून शारीरिक यातनाही दिल्या जात आहेत. याविषयी वर्ष २००७ पासून पोलिसांकडे आम्ही वारंवार तक्रारी केल्या; पण पोलीस त्याची साधी नोंद घेण्यासही सिद्ध नाहीत. धर्मांधांनी आमची भूमी बळकावली असून आमचे धार्मिक स्थानही उद्ध्वस्त केले आहे.
धर्मांध पोलिसांकडून अधिवक्ता रवींद्र घोष यांना मारहाण आणि कोठडीत डांबण्याचा प्रयत्न !
अधिवक्ता श्री. रवींद्र घोष, बांगलादेश मायनॉरिटी वॉच
यावर बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. रवींद्र घोष यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने बकेरगंज पोलीस ठाण्यात जाऊन पीडित हिंदु कुटुंबाला उद्ध्वस्त करणार्या धर्मांध मुसलमानांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली; मात्र पोलिसांनी त्यांनाही उडवाउडवीची उत्तरे देऊन धमकावण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे, तर पोलीस ठाण्यात येऊन आम्हाला न विचारताच आमचे छायाचित्र का काढता, असा कांगावा करत अधिवक्ता घोष यांना मारहाण करून कोठडीत डांबण्याचा प्रयत्नही केला. यानंतर घोष यांनी पोलीस महानिरीक्षक आणि गृहमंत्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याप्रकरणी बांगलादेश मायनॉरिटी वॉच पुढील चौकशी करत आहे.
- पाकच्या गायकाला भारतीय नागरिकत्व देणार्या शासनाचे बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या आतोनात छळाकडे दुर्लक्ष का ? हिंदूंनो, बांगलादेशमधील तुमच्या बांधवांचे रक्षण करण्यासाठी शासनाला भाग पाडा !
- कुठे एक दादरी झाल्यावर त्याविरोधात एकवठणारे सर्वत्रचे मुसलमान, तर कुठे पाक आणि बांगलादेश या देशांत धर्मांध हिंदूंना वेचून ठार करत असतांनाही त्याविरोधात काहीही न बोलणारे धर्माभिमानशून्य हिंदू !
- असहिष्णुतेचा कांगावा करत पुरस्कार परत करणार्यांना हिंदूंवरील हे अत्याचार दिसत नाहीत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात