Menu Close

तुम्ही एकवेळ मला कुत्रा म्हणा; पण पाकिस्तानी म्हणू नका…

पाकिस्तानच्या अत्याचारांमुळे देश सोडावा लागलेल्या मजदक दिलशान बलूच यांचा संताप

जगभरात आपल्याच धर्मियांवर अत्याचार करणारे मुसलमान ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नवी देहली : पाकिस्तानकडून बलुचिस्तान आणि गिलगिट प्रांतातील नागरिकांवर होणार्‍या अत्याचारावर पुन्हा एकदा प्रकाश पडला. या अत्याचारांमुळे देश सोडावा लागलेले बलुची नेते मजदक दिलशान बलूच यांनी तुम्ही एकवेळ मला कुत्रा म्हणा; पण पाकिस्तानी म्हणू नका…, अशा शब्दांत संताप व्यक्त केला.

कॅनडाच्या पासपोर्टवर पाकिस्तान क्वेटा हे शहर आढळल्याने देहली विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्‍यांनी मजदक यांची चौकशी केली. इकॉनॉमिक टाइम्सशी बोलतांना मजदक यांनी पाकिस्तानकडून बलुचिस्तानमध्ये होणार्‍या अत्याचाराची माहिती दिली. पाकिस्तानमुळे संपूर्ण आयुष्य अडचणीत गेल्याचेही त्याने सांगितले. ते म्हणाले, पाकिस्तानी सैन्याकडून होणार्‍या अत्याचारांमुळे माझ्यासारख्या सहस्रो लोकांनी स्वतःची जन्मभूमी सोडली आणि जगभरातील विविध देशांमध्ये आसरा घेतला. पाकिस्तानी सैन्याने चित्रपट निर्माते असलेल्या माझ्या वडिलांचे अपहरण केले आणि आईवर अत्याचार केले. या अत्याचाराला कंटाळून वर्ष २००८ मध्ये आमचे कुटुंब कॅनडाला गेले.

आता मजदक आणि त्यांची पत्नी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *