प्राण संकटात टाकून गोमातेला वाचवणारे हे गोरक्षक कधीतरी समाजकंटक असतील का ? आम्ही गोरक्षण करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही, अशी शासनाची वृत्ती बनल्यामुळेच सर्वत्र गोतस्करींचे प्रमाण वाढत असून गोरक्षकांवरही आक्रमणांचे प्रमाण वाढले आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
चंद्रपूर, २३ ऑगस्ट : नागपूरहून चंद्रपूरकडे जाणार्या २ ट्रकमधून गायींची तस्करी होत असल्याची माहिती हिंदु श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी ट्रकचा पाठलाग केल्यावर भद्रकाली बसस्थानकाजवळ तस्करांनी कार्यकर्त्यांवर वाहनातून गोळीबार केला आणि ते पसार झाले; परंतु पडोली गावाजवळ पोलिसांनी त्यातील एका ट्रकला अडवून एका आरोपीला अटक केली. (गोवंश हत्याबंदी कायदा असूनही गोरक्षकांना अशा प्रकारे प्राण संकटात घालून गोरक्षण करावे लागते आणि पोलीस गोरक्षकांवरच खोटे गुन्हे प्रविष्ट करतात, तर दुसरीकडे शासन या गोरक्षकांना समाजकंटक म्हणून हिणवते, हे दुर्दैवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. येथील श्री महाकालीचे दर्शन घेऊन हिंदु श्रीरामसेनेचे अध्यक्ष तथा गृहमंत्रालयाचे हिंदी सल्लागार सदस्य श्रीनिवास संभाशिव ध्यावर्तीवार आणि त्यांचे अन्य सहकारी नागपूरकडे जात होते.
२. काही वाहनांमधून उग्र वास आल्याने त्यातून गायींची तस्करी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ त्या वाहनांचा पाठलाग चालू केला आणि पोलिसांना कळवले. (गायींच्या तस्करीची माहिती हिंदुत्वनिष्ठांना मिळते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांना का मिळत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. नंदोरी पथकर नाक्यावर ट्रकला अडवण्यात आले; मात्र तेथील बॅरिकेडस् तोडून ट्रक निघून गेले. (यावरून गोतस्करांना पोलिसांचा कोणताही धाक वाटत नाही, हेच सिद्ध होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. ट्रकचा पाठलाग करत असतांना हिंदु श्रीराम सेनेच्या एका वाहनाला अपघात झाला. या अपघातात हिंदु श्रीरामसेनेचे काही कार्यकर्ते किरकोळ घायाळ झाले. (तस्करांवर कठोर कारवाई झाल्यासच गोरक्षकांचे प्रयत्न फलदायी ठरले, असे होईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात