समाजसेवेच्या नावाखाली धर्मांतरण करणाऱ्या मदर तेरेसांचा एवढा उदोउदो कशासाठी ? जनतेने हे टपाल तिकिट रद्द करण्याची मागणी टपाल खात्याकडे करावी ! – संपादक, हिंदुजागृती
कोलकाता : मदर तेरेसा यांना संतपद देण्याच्या समारंभाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गौरवार्थ जगभरात तयारी सुरू झाली आहे. भारतातही त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक विशेष टपाल पाकीट जारी करण्यात येणार आहे. २ सप्टेंबरला या पाकिटाचे अनावरण करण्यात येईल.
भारतीय टपाल खात्याकडून जारी करण्यात येणारे हे पाकीट रेशमापासून बनवलेले असणार आहे. त्यावर २०१० मध्ये मदर तेरेसा यांच्या जन्म शताब्दीनिमित्त भारत सरकारने जारी केलेले पाच रुपयांचे नाणे कोरण्यात येणार आहे. अशी केवळ एक हजार पाकिटेच बनविण्यात येणार आहेत.
मदर तेरेसांचे जन्मस्थान असलेल्या मॅसेडोनिया प्रजासत्ताकमध्येही सोन्याचा मुलामा असलेले चांदीचे नाणे हे येथील खास आकर्षण असेल. १०० दिनार किंमतीची ५० नाणी भारतात पाठवली जणार आहेत.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स