कोची (केरळ) : केरळमध्ये हिंदूंकडून रामायण मासम् (रामायण मास) मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने विश्व हिंदु परिषदेच्या वतीने विविध जिल्ह्यांमध्ये सलग ३० दिवस रामायणाच्या पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने एलमक्करा येथे आयोजित रामायण पारायणातील ३ दिवस हिंदु जनजागृती समितीकडून धर्माचरण, नामजपाचे महत्त्व, देवालय दर्शन या विषयांवर प्रवचने करण्यात आली. त्यानिमित्ताने १४ ऑगस्ट या दिवशी झालेल्या विश्व हिंदु परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात अभिनेत्री कु. जानकी कृष्णन् यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या कु. अदिती सुखटणकर यांचा सत्कार करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात