ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप समजल्यावर पुन्हा स्वगृही परतणार्या हिंदूंचे अभिनंदन ! त्यांचा आदर्श अन्य धर्मांतरित हिंदूंनी घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
थिरुवनंतपुरम् : केरळमध्ये काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राबवलेल्या घर वापसी मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. ख्रिस्ती धर्मातील दुजाभावाच्या वागणुकीला कंटाळून बरेच दलित ख्रिस्त्यांनी घर वापसी केली असून काही त्या वाटेवर आहेत.
१. केरळ शासनाच्या राजपत्रामधे प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०१५ मधे १ सहस्र ३३५ जणांनी धर्मांतर केले. यामध्ये ६६० दलित ख्रिस्ती असून त्यांनी हिंदु धर्मात प्रवेश केला आहे.
२. गेल्या १९ महिन्यांमधे १ सहस्र ११९ जणांनी ख्रिस्ती धर्माला सोडचिठ्ठी दिली. ८४० जणांनी हिंदु धर्म सोडला, तर ८५ मुसलमानांनी इस्लाम धर्म सोडला.
३. आरक्षणाचा लाभ उठवण्यासाठी दलित ख्रिस्ती हिंदु धर्मामध्ये प्रवेश करत आहेत. तसेच ख्रिस्ती धर्मातील दुजाभावाच्या वागणुकीला ते कंटाळले आहेत, असे केरळ धर्मांतरित ख्रिस्ती विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष शिन्स पीटर यांनी सांगितले.
४. हिंदु अनुसूचित जातीतील लोकांचे राहणीमान दलित ख्रित्यांपेक्षा खूप चांगले आहे, असे या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन्. रविंद्रन् यांनी सांगितले.
५. धर्मांतरितांना ख्रिस्ती धर्मामध्ये दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. मूळ ख्रिस्ती समाज नव ख्रिस्त्यांशी रोटी-बेटी व्यवहार ठेवत नाहीत. तसेच दलित ख्रिस्ती धर्मगुरु (पाद्री) होण्याची शक्यता खूप अल्प असते, असे दलित कार्यकर्ता सनी कपीकड यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात