Menu Close

जिहादी भटकळ बंधू ‘इसिस’ मध्ये; गुप्तचर विभागाकडे माहिती !

01ss1

रियाज भटकळ आणि त्याचा भाऊ इक्‍बाल भटकळ

मुंबई : देशात घातपाती कारवाया घडविणाऱ्या “इंडियन मुजाहिदीन‘ (आयएम) या दहशतवादी संस्थेचा संस्थापक सदस्य रियाज शाहबंदरी ऊर्फ रियाज भटकळ आणि त्याचा भाऊ इक्‍बाल भटकळ या दोघांनीसुद्धा “इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया‘ (इसिस) या दहशतवादी संघटनेसाठी काम करायला सुरवात केल्याची खळबळजनक माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटना “इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स‘कडून (आयएसआय) मिळत असलेल्या सापत्न वागणुकीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

“इंडियन मुजाहिदीन‘साठी काम करणाऱ्या राज्यातील बहुसंख्य “स्लीपर सेल‘नी “इसिस‘साठी काम करायला सुरवात केल्याचेही पुढे आले आहे. मुंबईसह देशभरात २००६ पासून साखळी बॉंबस्फोट घडविणाऱ्या “आयएम‘ या दहशतवादी संघटनेची पाळेमुळे मुंबई पोलिसांनी उखडून फेकली आहेत. ‘१३/७’ च्या बॉंबस्फोट मालिकेनंतर या संघटनेसाठी भारतात कारवाया करण्याची जबाबदारी असलेला यासिन भटकळ यालासुद्धा दिल्ली पोलिसांनी अटक केल्याने संघटना खिळखिळी झाली. अनेक मोहिमांत कुचकामी ठरल्याने “आयएसआय‘ आणि “लष्करे तैयबा‘ने भटकळ बंधूंना गेल्या काही महिन्यांपासून बाजूला सारले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासातही रियाज भटकळ “आयएसआय‘ आणि “लष्करे तैयबा‘कडून मिळत असलेल्या सापत्न वागणुकीमुळे निराश झाल्याचे उघडकीला आले होते. त्यामुळेच या दोघा बंधूंनी “इसिस‘मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे गुप्तचर विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. मूळचे कर्नाटकातील भटकळ येथील असलेले रियाज आणि इक्‍बाल सुन्नी पंथीय आहेत. “इसिस‘ची निर्मितीही स्वतंत्र सुन्नी राष्ट्र निर्मितीच्या नावाखाली झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात जिहादच्या नावे घातपाती कारवायांत सहभागी होणाऱ्या बहुसंख्य तरुणांचा कल “इसिस‘कडे वाढला आहे. भटकळ बंधूंसोबत असलेल्या “स्टुडंट्‌स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया‘ (सिमी) आणि “आयएम‘च्या देशभरातील मोड्युल्समध्ये सुन्नी तरुणांचाच अधिक समावेश होता. सोबतचे लोक “इसिस‘मध्ये सहभागी होऊ लागल्याने रियाज आणि इक्‍बालने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

रियाज आणि इक्‍बाल यांनी “इसिस‘साठी काम करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गुप्तचर यंत्रणांच्या भुवया उंचावल्या आहेत. रियाज आणि इक्‍बालच्या या नव्या भूमिकांमुळे त्यांच्यापासून दूर जात असलेले “सिमी‘ आणि “आयएम‘चे स्लीपर सेल पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली येण्याची शक्‍यताही गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली.

भटकळ बंधूंची कृत्ये

  • इक्‍बाल भटकळ : पुण्यात इंडियन मुजाहिदीन वाढवण्यात भटकळ बंधूंचा पुढाकार; रियाज व इक्‍बालचे पुण्यातील कोंढवा परिसरात काही काळ वास्तव्य
  • रियाज भटकळ : मुंबई, हैदराबाद, जयपूर, अहमदाबाद व नवी दिल्लीतील बॉंबस्फोट मालिकेचा सूत्रधार; तसेच या स्फोटांचे नियोजन, अंमलबजावणी व त्याला अर्थसाह्य करण्याची जबाबदारी रियाजवरच होती.

स्त्रोत : सकाळ

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *