वाराणसीमध्ये राष्ट्रीय हिंदू आंदोलन
वाराणसी : काश्मीरमधील हिंसाचार रोखण्यासाठी भारतीय सैन्याला सर्वाधिकार द्यावा आणि आतंकवादी अन् त्यांचे समर्थक यांच्याविरोधात कारवाई करावी, तसेच पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षकांविषयी केलेले विधान मागे घ्यावे या संदर्भात वाराणसी येथील शास्त्रीघाटाजवळ २० ऑगस्टला राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदु युवा वाहिनी, अध्यात्म न्यास समिती, संतश्री आसारामजी आश्रम, भारत विकास परिषद, होप फाऊंडेशन, इंडिया विथ विज्डम, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी सहभाग घेतला. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनामध्ये हिंदुुत्त्वनिष्ठ अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी, डॉ. अजयकुमार जायसवाल, श्री. सतीश शर्मा, श्री. मुन्नालाल जायसवाल, श्री. महेश प्रसाद, डॉ. आर्.आर्, शर्मा, श्री. सुजीत चौबे, श्री. राजकुमार मिश्र, श्री. शिवप्रसाद मिश्र, श्री. प्रवीण श्रीवास्तव, श्री. जयशंकर सिंह, श्री. अभिषेक सिंह, श्री. बृजेशकुमार पाण्डेय, श्री. विनीत श्रीवास्तव यांनी त्यांचे विचार मांडले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात