Menu Close

अबिद पाशा याने हिंदुद्वेषातून ७ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या केल्याचे उघड !

धर्मांध मुसलमान हिंदूंना ठार करतात तेव्हा कोणीही त्यांचा विरोध किंवा निषेध करत नाहीत; मात्र एखाद्या पुरोगाम्याची किंवा कम्युनिस्टाची हत्या झाली, तर हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना उत्तरदायी ठरवण्याचा आटापिटा केला जातो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

म्हैसूर (कर्नाटक) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राजू यांच्या हत्येच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अबिद पाशा याने हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या ७ कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या आहेत, तर हत्या करण्याचे २ प्रयत्न फसले आहेत. या हत्येच्या प्रकरणी त्याच्या विरोधात म्हैसूर आणि मंगळुरू येथे गुन्हे प्रविष्ट आहेत. पाशा याने धर्मद्वेषातून सर्व हत्या केल्याचे राजू हत्या प्रकरणी अन्वेषणाच्या वेळी उघड झाले आहे, असे पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी पत्रकारांना सांगितले.

३४ वर्षीय पाशा याचा उद्योगपतींचा मुलगा विघ्नेश आणि त्यांचे नातेवाईक सुधींद्र यांच्या हत्येच्या प्रकरणात हात होता. त्यांचे अपहरण करून ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. पैसे न मिळाल्याने त्याने दोघांचीही हत्या केली होती. वर्ष २०११ मधे हे प्रकरण उघडकीस आले होते; मात्र पाशा याने त्या वेळी अटक चुकवली होती.

मुडबिद्री येथे मुसलमान अधिवक्ता नौशद याच्या खुनाचा सूड घेण्यासाठी पाशा याने अधिवक्ता शांतीप्रसाद हेगडे यांची हत्या केली होती. त्यानंतर त्याने प्रवीण ताज यांचा बळी घेतला होता. राजू यांच्या हत्येच्या प्रकरणात पाशा याच्यासह अयुब खान, महंमद हनिफ, हमीद खान, अय्यद अमीन, शबील आणि मुझामिल यांना अटक करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *