कथित आरोपाखाली कारागृहात असणार्या हिंदु संतांची अपकीर्ती करणारी हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे अन्य धर्मियांच्या धर्मगुरूंच्या या कुकृत्यांविषयी गप्प का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
- १४ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप !
- शासकीय महिला डॉक्टरच्याही आवळल्या मुसक्या !
कोची : येथील कोत्तापुरम कॅथॉलिक चर्चचे वासनांध फादर एडविन फिगारेझ (४१ वर्षे) याच्यावर एका १४ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला होता. गेले ७ मास फरार असलेला फादर अखेर पोलिसांना शरण आला असून फादरला साहाय्य केल्याच्या आरोपाखाली पुथेन्वेलीक्कारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टर अजीथा यांचेही नाव या प्रकरणी चवथा आरोपी म्हणून पोलिसांनी आरोपपत्रात समाविष्ट केले आहे आणि त्यांना अटकही करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार –
१. कोत्तापुरम कॅॅथॉलिक चर्चचे वासनांध फादर एडविन फिगारेझ याने चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी येणार्या १४ वर्षीय मुलीवर जानेवारी ते मार्च २०१५ या कालावधीत अनेक वेळा बलात्कार केला.
२. २९ मार्च २०१५ या दिवशी फादरने असेच तिचा लैंगिक छळ केल्यानंतर न राहवल्याने त्या मुलीने त्याविषयी तिच्या कुटुंबियांना सांगितले.
३. तिचे कुटुंबीय तिला पुथेन्वेलीक्कारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टर अजीथा यांच्याकडे घेऊन गेले.
४. अजिथा यांनी तपासणी केल्यानंतर त्या मुलीचा लैंगिक छळ झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले; पण ही माहिती त्यांनी लपवून ठेवली.
५. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन वासनांध फादरच्या विरोधात तक्रार नोंद केली.
६. तेव्हापासून फादर फिगारेझ फरार झाला होता. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्जही दाखल केला होता; पण केरळ उच्च न्यायालयाने त्यांचा हा अर्ज फेटाळून लावला.
७. त्यामुळे अखेर ७ मास फरार राहिल्यानंतर डिसेंबर २०१५ मध्ये फादर पोलिसांना शरण आला.
८. फादर शरण आल्यावर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर डॉक्टर अजिथा यांचाही या प्रकरणातील सहभाग उघड झाला. त्यामुळे पोलिसांनी आरोपपत्रात अजिथा यांचेही नाव समाविष्ट केले.
९. फादर फिगारेझ याची चर्चसंस्थेनेही त्याच्या पदावरून हकालपट्टी केली आहे. बिशपच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या समितीने या प्रकरणी सादर केलेल्या प्राथमिक अहवालावरून हे पाऊल उचलले असल्याचे चर्चसंस्थेने स्पष्ट केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात