ठाणे : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महानगरपालिकेचे आयुक्त श्री. सुनील चव्हाण यांना गणेशमूर्तींचे विसर्जन शास्त्रानुसार वाहत्या पाण्यात करणे कसे योग्य आहे, याविषयीचे निवेदन देण्यात आले. ठाणे शहरातील सर्व तलावांत एक भिंत उभारून ठराविक भागात विसर्जन करणे हा कृत्रिम तलावाला उत्तम पर्याय आहे. त्यातून निधीचीही बचत होईल. या वेळी आयुक्तांनी तलावात भिंत उभारून विसर्जनाची व्यवस्था करण्याविषयी सूचना देणार असल्याचे आश्वासन दिले. निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महानगरपालिका सांडपाण्याच्या शुद्धीची प्रक्रिया न राबवता ते पाणी समुद्रात सोडते. त्यातून नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित होतात. त्यावर काहीच कृती केली जात नाही; पण गणेशमूर्ती विसर्जनामुळे पाणी प्रदूषित होते, असा बोभाटा करण्यात येतो. प्रतिवर्षी सांडपाण्यावर प्रक्रिया न केल्याने होणारे प्रदूषण आणि आजार यांविषयीची आकडेवारी आयुक्तांना सादर करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात