Menu Close

सनातनच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्च्यातील मागण्यांचे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

पुणे, २५ ऑगस्ट : समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेच्या समर्थनार्थ महाराणा प्रताप उद्यानापासून कसबा गणपति मंदिरापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला होता. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुरोगाम्यांकडून कोणत्याही पुराव्यांविना पूर्वग्रहातून केल्या जाणार्‍या सनातन संस्थेच्या अपकीर्तीच्या पार्श्‍वभूमीवर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी उपस्थित हिंदुत्ववाद्यांनी ‘डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी अन्वेषण यंत्रणांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे चौकशी करावी आणि राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवावा’, अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना देण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *