पालघर, २६ ऑगस्ट : भारत हिंदुबहुल देश असूनही देशात गोहत्या, मंदिर सरकारीकरण, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी धर्मविरोधी घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हे आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे. राष्ट्रीय स्तरावरील कार्याप्रमाणे जिल्हास्तरावरही स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून हिंदुत्वाचे कार्य चालू आहे. गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनातून प्रेरणा घेऊन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू गोवंश रक्षा समिती यांच्या वतीने २८ ऑगस्ट या दिवशी नालासोपारा चावडीनाका येथील श्री महाकाली मंदिराच्या सभागृहात एकदिवसीय जिल्हास्तरीय हिंदु अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनात अधिवक्ता, आधुनिक वैद्य, संपादक, पत्रकार, उद्योजक, विविध संप्रदाय यांसह २० हिंदुत्ववादी संघटनांचे एकूण ८५ धर्माभिमानी सहभागी होणार असून धर्मांतर, आतंकवाद, लव्ह जिहाद, गोहत्या या धर्मावरील आघातांवर चर्चा होऊन कृती कार्यक्रम ठरणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी २६ ऑगस्टला पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. जितेंद्र हजारे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. शिवकुमार पांडे, हिंदू गोवंश रक्षा समितीचे प्रवक्ता श्री. दीप्तेश पाटील, सनातन संस्थेच्या प्रवक्ता सौ. नयना भगत उपस्थित होत्या.
अन्य मान्यवरांनी मांडलेले विचार
अधिवेशनाच्या माध्यमातून संघटित धर्मकार्य साधले जाईल ! – दीप्तेश पाटील, प्रवक्ता, हिंदू गोवंश रक्षा समिती
नालासोपारा, वसई, विरार आदी भागांत ख्रिस्ती मिशनर्यांकडून मोठ्या प्रमाणात चंगाईच्या सभा चालू आहेत. गोवंशियांची हत्याही केली जात आहे. त्या रोखण्यासाठी गोवंश रक्षा समितीच्या माध्यमातून आमचे कार्य चालू आहे; मात्र हे रोखण्यासाठी कायद्याने जी कारवाई व्हायला हवी, ती होतांना दिसत नाही. त्यामुळे हिंदूंनी संघटितपणे कार्य करणे आवश्यक आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून संघटित धर्मकार्य साधता येईल.
राष्ट्रविषयक समस्यांच्या निराकरणासाठी अधिवेशनात कृती आराखडा निश्चित केला जाईल ! – श्री. शिवकुमार पांडे, जिल्हा संयोजक, बजरंग दल
स्वत:वर होणार्या अन्यायाविषयी हिंदूंमध्ये गांभीर्य नाही. नालासोपारा येथे इसिसचा प्रसार वाढत आहे. याविषयी हिंदूंनी सतर्क रहायला हवे. देशाचे मीठ खाणारे देशद्रोही वक्तव्य करतात आणि त्यांना प्रसिद्धी दिली जाते. जेएनयूमध्ये घडलेले सर्वच प्रकार निंदाजनक आहेत. वर्ष १९९० पासून अजूनपर्यंत काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही. या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी अधिवेशनात चर्चा होऊन कृती आराखडा निश्चित केला जाईल.
हिंदूसंघटनाविना पर्याय नाही ! – श्री. जितेंद्र हजारे, अध्यक्ष, मातृभूमी प्रतिष्ठान, नालासोपारा
नालासोपारा हे गुन्हेगारांचे मोठे केंद्र बनत आहे. या भागात नायजेरिन लोकांची लोकांची वस्ती वाढत असून त्याचा आजूबाजूच्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. याविषयी मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने पोलिसांना निवेदन देऊनही ठोस कारवाई झालेली नाही. राज्यात वसई हे धर्मांतराचे केंद्रच झाले आहे. या समस्यांच्या निराकरणासाठी हिंदूसंघटनाविना पर्याय नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात