-
पोलिसांकडून कार्यकर्त्यांनाच शिवीगाळ आणि मारहाण !
-
विहिंपकडून रस्ता बंद आंदोलन !
-
समाजकंटकांऐवजी ८ कार्यकर्त्यांना कह्यात घेतले !
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २६ ऑगस्ट : येथील भारतमाता हौसिंग सोसायटी येथे विश्व हिंदु परिषदेचा छत्रपती शंभू राजांचे चित्र असलेला डिजिटल फलक अज्ञात समाजकंटकांनी २६ ऑगस्ट या दिवशी फाडला. अशा प्रकारे फलक फाडला जाण्याची ही चौथी वेळ असल्याने संतप्त झालेल्या विहिंपच्या कार्यकर्त्यांनी रस्ता बंद आंदोलन केले.
या वेळी शिवाजीनगर पोलिसांनी विहिंपच्या स्त्री आणि पुरुष कार्यकर्त्यांना शिवीगाळ करून, तसेच त्यांच्यावर लाठीमार करून पांगवले, तसेच ८ जणांना कह्यात घेतले. यामुळे हिंदुत्ववाद्यांमध्ये पोलिसांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. (पोलिसांची ही कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचाच प्रकार होय ! हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांवर हात उगारणारे असे पोलीस जनतेचे रक्षक नव्हे, तर भक्षकच आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. विहिंपच्या वतीने नगरपालिका आणि पोलीस यांची अनुमती घेऊन भारतमाता हौसिंग सोसायटी येथे डिजिटल फलक लावण्यात आला आहे.
२. आतापर्यंत ३ वेळा फलक फाडल्यानंतर प्रत्येक वेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार देऊन अज्ञात समाजकंटकांना अटक करण्याची मागणी केली; मात्र पोलिसांनी त्याकडे कानाडोळा करून एकाही गुन्हेगाराला अटक केली नाही.
३. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी विहिंपचे जिल्हामंत्री श्री. शिवजी व्यास आणि तालुकाप्रमुख श्री. दत्ता पाटील यांसह महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची माहिती विहिंपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली; मात्र पोलिसांनी विहिंप आणि बजरंग दलाचे सर्वश्री संतोष हत्तीकर, शिवजी व्यास, राजू शिंदे, दत्ता पाटील, मुकुंद उरूणकर, सुजित ठाणेकर, विकास शिकलगार आणि विजय जाधव असे एकूण ८ पदाधिकार्यांनाच कह्यात घेतले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात