नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नागपूर : पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे असंतोष पसरला आहे. पंतप्रधानांनी गोहत्या करणार्या धर्मांधांना खडे बोल ऐकवावेत अन् त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, गोरक्षकांविषयी केलेले वक्तव्य मागे घ्यावे आणि गोमातेची क्षमा मागावी, या मागण्यांसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने संविधान चौक, नागपूर येथे २३ ऑगस्ट २०१६ या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
काश्मीर आतंकवादमुक्त करण्यासाठी केंद्रशासनाने काश्मिरी धर्मांधांवर कडक कारवाई करावी आणि आतंकवाद मोडून काढण्यासाठी सैन्याला सर्वाधिकार द्यावेत, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत क्षीरसागर, रणरागिणी शाखेच्या सौ. नंदा खंडागळे आणि हिंदु विधीज्ञ परीषदेच्या अधिवक्त्या सौ. वैशाली महेश परांजपे यांनीही मार्गदर्शन केले.
क्षणचित्र : या वेळी स्थानिक युसीएन् केबलचे वार्ताहर उपस्थित होते. त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या श्री. अतुल आर्वेन्ला यांची मुलाखत घेऊन ती प्रसारित केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात