हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर नवनाथ सेवा संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अभिनंदनीय निर्णय !
मानखुर्द : येथील महाराष्ट्र नगर नवनाथ सेवा संघ या सार्वजनिक गणेश मंडळाला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेच्या अंतर्गत समितीच्या वतीने गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांना भेटून आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याविषयी त्यांचे प्रबोधन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र नगर नवनाथ सेवा संघ सार्वजनिक गणेश मंडळानेे जुगार आणि पत्त्यांचा खेळ बंद करून आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा निश्चय केला आहे. (धर्मशास्त्र कळल्यावर त्यानुसार उत्सव साजरा करणार्या महाराष्ट्र नगर नवनाथ सेवा संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आदर्श अन्य मंडळांनीही घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या संदर्भात महाराष्ट्र नगर नवनाथ सेवा संघ सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री. दीपक पवार म्हणाले, मंडळाला २५ वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त हिंदु जनजागृती समितीने केलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही जुगार आणि पत्त्यांचा खेळ बंद करून आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. हे केवळ समितीच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले. मंडळाचे सचिव श्री. सुभाष गायकवाड हे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्या धर्मशिक्षणवर्गाला येतात. आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी श्री. गायकवाड यांनी पुढाकार घेतला. समितीने केलेल्या प्रबोधनाविषयी महाराष्ट्र नगर नवनाथ सेवा संघ सार्वजनिक गणेश मंडळाने हिंदु जनजागृती समितीचे आभार व्यक्त केले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात