गोवंशहत्या बंदी कायदा होऊनही मागण्यांसाठी मोर्चा काढावा लागणे हे खेदजनक ! –
अकोला येथील मोर्च्यात उपस्थित असलेल्या सहस्रोंच्या संख्येतील जनसमुदायाची मागणी
अकोला : जैनांची काशी, बाळादेवी संस्थान, तसेच संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगावला जाणार्या मार्गाच्या ठिकाणी प्रस्तावित अलवाफी पशूवधगृहाला मोर्च्याद्वारे निषेध नोंदवण्यात आला. हे पशूवधगृह रहित करा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. जैन साध्वी प.पू. प्रीतीधर्माश्रीजी अधिठाणा सात तथा प.पू. स्थानकवासी विशुद्धीजी महासती अधिठाणा चार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
या वेळी विविध सामाजिक, धार्मिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते सहस्रोंच्या संख्येने उपस्थित होते. जैन मंदिरातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना निवेदन देण्यात आले, तसेच सरकारला आंदोलनाची माहिती देण्याची विनंती करण्यात आली.
शेकडो गोवंशियांची हत्या होणार असल्याची भीती !
‘प्रस्तावित पशूवधगृहात प्रतिदिन ६८ सहस्र किलो मांसावर प्रक्रिया होणार असून त्यासाठी शेकडो गोवंशियांची हत्या करण्यात येईल,’ अशी भीती व्यक्त होत आहे. पशूवधगृहाला बाळापूर नगरपरिषदेच्या आमसभेत अनुमती देण्यात आली आहे. पशूवधगृहाने शासनाकडे परवाना मागतांना केवळ कोंबड्या, म्हातार्या म्हशी, बकरे यांचा व्यवसाय करू, असा शेरा लिहिला आहे; पण सध्याची स्थिती पहाता अशी जनावरे अत्यल्प असून गोवंशियांचीच हत्या होण्याचा धोका अधिक बळावतो. पशूवधगृह पर्यावरण, तसेच नागरिकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावना दुखावणारे असल्याने अनुमती नाकारण्याची मागणी होत आहे. (जे समाजाला कळते, ते शासनाला का कळत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात