गेली कित्येक वर्ष सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती समाजाला धर्मशास्त्रानुसार चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून बनवलेल्या गणेशमुर्तींची स्थापना करण्यास सांगत आहे. मोदी यांनी केलेल्या या आव्हानाबद्दल त्यांचे अभिनंदन. आता तरी हिंदु धर्मशास्त्रानुसार कृती करणार का ? – संपादक, हिंदुजागृती
नवी देहली : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गणेशोत्सव आणि दुर्गा पूजा पर्यावरणपूरक अशा इकोफ्रेंडली पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. आपण आपल्या जुन्या परंपरेनुसार चिकणमातीच्या मुर्त्या का बनवत नाही ? मातीच्या मुर्त्यांमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. पर्यावरण आणि समुद्राची काळजी घेणे ही सुद्धा एकप्रकारची पूजाच आहे असे मोदींनी सांगितले.
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदी मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणा-या पीव्ही सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि ललिता बाबरचे कौतुक केले.
संदर्भ : लोकमत