Menu Close

समाजातील परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता ! – ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर

नगर येथे हिंदूसंघटन मेळाव्यात राष्ट्र-धर्म रक्षणार्थ हिंदूंची एकजूट !

नगर : सध्याच्या सरकारची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे हज यात्रेला अनुदान द्यायचे आणि दुसरीकडे पंढरपूर, आळंदी येथे वारीसाठी जाणार्‍या वारकर्‍यांना साध्या मूलभूत सुविधाही मिळत नाही. समाजाला निःस्वार्थपणे धर्मशिक्षण देणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांमागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लावला जातो. सरकारच्या अशा भूमिकेमुळे समाजात असमतोल निर्माण होतो. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी जातीपातीत न अडकता संकुचित वृत्ती बाजूला सोडून संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांनी केले. येथील सावेडी भागातील कोहिनूर मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यामध्ये ते मार्गदर्शन करत होते. हा मेळावा २७ ऑगस्ट या दिवशी पार पडला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी आणि हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. अश्‍विनी कुलकर्णी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला ह.भ.प. क्षीरसागर महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि महर्षी यांच्या संदेशाचे वाचन ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. वैभवी भोवर यांनी केले. या वेळी श्री. मिलिंद धर्माधिकारी यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि कु. अश्‍विनी कुलकर्णी यांनी स्वसंरक्षण काळाची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *