Menu Close

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनात कोणताही अपप्रकार घडलेला नसतांना वृत्तपत्रांकडून व्याख्यान उधळले, अशी खोटी वृत्ते !

shivpratisthan1

मुंबई : श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे २७ ऑगस्ट या दिवशी लोअर परळ येथील ना.म. जोशी मार्गावरील म्यु. सेकंडरी हायस्कूल येथे श्रीदुर्गामाता दौड आणि शिवचरित्र या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. व्याख्यान प्रारंभ होण्यापूर्वी स्वाभिमानी संघटनेच्या पाच महिलांनी गुरुजींनी मराठा आरक्षणावर बोलावे, असा आग्रह धरला. त्या वेळी उपस्थित असणार्‍या अन्य कार्यकर्त्यांनी हे राजकीय व्यासपीठ नाही, असे सांगून पोलिसांकरवी त्यांना बाहेर काढले. हा प्रकार झाल्यावर पू. गुरुजींचे पुढील व्याख्यान व्यवस्थित पार पडले. अशी घटना प्रत्यक्ष असतांना काही वृत्तपत्रांनी मात्र व्याख्यानात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ, महिलांनी व्याख्यान रोखले, २५० कार्यकर्त्यांचा गोंधळ, अशी अत्यंत खोटी आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी वृत्ते प्रसारित केली.

या संदर्भात मुंबई विभागाचे श्रीशिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री. बळवंतराव दळवी म्हणाले, कार्यक्रम चालू होण्यापूर्वी पाच महिला मागे बसल्या होत्या. कार्यक्रम चालू होण्यापूर्वी त्यांनी उठून गुरुजींनी मराठा आरक्षणावर बोलावे. गुरुजींनी आम्हाला न्याय द्यावा, असे वक्तव्य केले. त्या वेळी माझ्यासह अन्य कार्यकर्त्यांनी हा प्रश्‍न शासनाच्या अखात्यारित असल्याने हा प्रश्‍न इथे उपस्थित करणे अयोग्य असल्याचे त्यांना सांगितले. या वेळी त्यांना कोणत्या संघटनेच्या आहात, असे विचारल्यावर त्यांनी आम्ही स्वाभिमानीच्या नाही, असे सांगितले. महिला असल्याने आम्ही पोलिसांच्या सहकार्याने त्यांना पोलिसांना बाहेर घेऊन जाण्यास सांगितले. कार्यक्रम संपल्यावर पोलिसांनी विनंती केल्यावर पू. गुरुजी सभास्थळापासून बाहेर पडतांना त्यांच्या समवेत पोलीस उपस्थित होते, इतकेच. यानंतर शिवसेनेचे स्थानिक आमदार श्री. सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडला.

हिंदुत्ववादी संघटनांची अपकीर्ती करणार्‍या संघटनांचे षड्यंत्र जाणा !

हिंदुत्ववादी संघटनांची अपकीर्ती करणारे लिखाण व्हॉट्स अ‍ॅपवरून फिरत असते, त्यापासून सावध रहायला हवे, तसेच सध्या हिंदुत्ववादी संघटनांना विविध माध्यमांतून होणारा विरोध पहाता हिंदूसंघटनाची किती आवश्यकता आहे, तेही लक्षात येते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *