मीरपूर (पाकिस्तान) : १५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात बलुचिस्तानचे सूत्र उपस्थित केल्यापासून पाकमध्ये पाकपासून स्वतंत्र होऊ इच्छिणार्या लोकांना बळ मिळाले आहे. पाकिस्तानमध्ये पाकपासून स्वतंत्र होऊ इच्छिणार्यांचा आवाज आता वाढत चालला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट, बाल्टीस्थान, तसेच बलुचिस्तान यानंतर आता सिंधमध्येही वेगळ्या सिंधु देशाची मागणी होऊ लागली आहे. २९ ऑगस्टला सिंधच्या मीरपूर खास या शहरातील लोकांनी निदर्शने करत वेगळ्या सिंधु देशाची मागणी केली. तसेच लंडन येथेही चिनी दूतावासासमोर ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीइसी)’ चा बलुची नागरिकांनी विरोध केला. या वेळी त्यांना पाकमधील सिंधी लोकांनीही सहभागी होऊन पाठिंबा दिला.
१. लंडन येथे वर्ल्ड सिंधी काँग्रेसचे अध्यक्ष लखु लुहाना यांनी म्हटले की, कोणत्याही परिस्थितीत चीन आणि पाक यांच्या सहयोगाने बलुचिस्तानमध्ये बनवण्यात येणार्या सीपीइसीला स्वीकारण्यात येणार नाही.
२. या निदर्शनांच्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
३. बलुची नेते मेंगल म्हणाले की, ‘ज्या वस्तू लुटता येतील त्या लुटा’ असेच चीन आणि पाक यांचे धोरण आहे. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, बलुचिस्तानमध्ये बलुची जनतेच्या सहमतीव्यतिरिक्त येथे काहीही होऊ शकत नाही.
४. पाकमध्ये जेवढे हिंदु आता वाचले आहेत, त्यातील बहुसंख्य हिंदु सिंधमध्ये रहात आहेत. येथे हिंदु व्यापार्यांचा मोठा प्रभाव आहे. वर्ष १९४७ मध्ये येथून हिंदू मोठ्या संख्येने भारतात आले होते आणि नंतरच्या अत्याचारांमुळेही हिंदू भारतात येत राहिले.
भारताने बलुचिस्तानमध्ये हस्तक्षेप केल्यास चीन शांत बसणार नाही ! – चीनची धमकी
बीजिंग : चिनी मुत्सद्यांच्या गटाने भारताला धमकी दिली आहे की, भारताने बलुचिस्तानमध्ये हस्तक्षेप केल्यास आणि त्यामुळे चीन-पाक यांच्यातील बलुचिस्तानमधील आर्थिक कॉरिडोर (सीपीईसी) योजना बाधित झाली, तर चीनलाही यात हस्तक्षेप करावा लागेल.
चायनिज इन्स्टिट्युट ऑफ कंटेंपररी इंटरनॅशनल रिलेशन्स् (सीआयसीआयआर्) या संस्थेतील ‘इन्स्टिट्युट ऑफ साऊथ अॅण्ड साऊथईस्ट एशियन अॅण्ड ओशनियन स्टडीज्’चे संचालक हू शिशेंग यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही चेतावणी दिली आहे.
हू यांनी म्हटले की, बलुचिस्तानच्या प्रकरणामुळे पाकला होणार्या अडचणीमुळे त्याचा भारत-चीन संबंधांवर परिणाम होईल. भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षणविषयक सहकार्य चीनसाठी चिंतेचा विषय बनला आहे. पूर्वी असे वाटत नव्हते; मात्र आता चिंता वाटू लागली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात