पुणे : गणेशमूर्तींचे अशास्त्रीय पद्धतीने कृत्रिम हौदांमध्ये अथवा घरीच बादलीमध्ये अमोनियम बायकार्बोनेटच्या साहाय्याने विसर्जन करण्याविषयी महानगरपालिका, तसेच कथित पर्यावरणवादी यांच्याकडून प्रचार करण्यात येत आहे. वास्तविक या दोन्ही पद्धती, तसेच मूर्तीदानासारखे उपक्रम धर्मशास्त्रसंमत नाहीत. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव धर्मशास्त्राला अनुसरून साजरा केला जावा आणि उत्सवात शिरलेले अपपक्रार, तसेच धर्मशास्त्रविरोधी उपक्रम थांबवण्यात यावेत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात आले.
या वेळी समितीचे सर्वश्री प्रवीण नाईक, कृष्णाजी पाटील, गजानन मुंज उपस्थित होते. या प्रसंगी समितीच्या वतीने मूर्तींसंदर्भात मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना, तसेच गणेशमूर्तींमुळे होणार्या जलप्रदूषणाविषयीचा फसवा प्रचार खोडून काढणारे अहवाल आदी कागदपत्रे सादर केली. कुणाल कुमार यांनी समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजेंद्र मुठे यांनाही वरील मागणीचे निवेदन देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात