श्रीगणेशाची आरती, तसेच श्लोक यांचे विडंबन करणारे हिंदुद्वेष्टेच होत ! असे विडंबन अन्य पंथियांच्या बाबतीत झाले असते, तर आतापर्यंत सरकार, पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून त्याची त्वरित दखल घेऊन ते सामाजिक संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आले असते. तथापि बहुतांश हिंदू निद्रिस्त आणि धर्माभिमानशून्य असल्याने त्यांच्या श्रद्धास्थानांचे होणारे विडंबन आवडीने वाचतात ! यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते !
हिंदूंचा पवित्र गणेशोत्सव तोंडावर आला असतांना काही हिंदुद्वेष्ट्यांकडून सामाजिक संकेतस्थळावर जाणीवपूर्वक श्रीगणेशाची आरती, तसेच अन्य श्लोक यांची विनोदी आणि उपहासात्मक मांडणी करून अशलाघ्य विडंबन करण्यात येत आहे. सध्या पुढील शब्द सामाजिक संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. या अयोग्य शब्दांस काही धर्माभिमानी हिंदूंनी स्वत:हून योग्य शब्द काय आहेत ते सांगून जागृती करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. ही आरती आणि श्लोक यांतील चुकीचे शब्द अन् त्यापुढे धर्माभिमानी हिंदूंनी सांगितलेले योग्य शब्द येथे देत आहोत. हिंदूंनी जागरूक राहून स्वत:च्या श्रद्धास्थानांचे विडंबन रोखून धर्मकर्तव्य बजवावे, ही अपेक्षा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात