Menu Close

ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणारे धर्मांतराचे कार्य रोखल्यानेच माझ्या विरोधात षड्यंत्र ! – पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू

pu_asaram_bapuji
पू. आसारामजी बापू

जोधपूर : कथित लैंगिक शोषणाच्या आरोपांतर्गत गेल्या ३ वर्षांपासून अटकेत असणारे पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू प्रतिदिन येथील न्यायालयात खटल्यासाठी येत आहेत. अशा वेळी एका दैनिकाच्या वार्ताहराने त्यांना विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना पू. बापू म्हणाले की, ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणारे हिंदूंच्या धर्मांतराचे काम रोखल्यामुळेच माझ्या विरोधात षड्यंत्र रचून मला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले, या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला.

पू. बापूंनी पुढे म्हटले की . . .

१. ज्यांना माझा खरेपणा माहिती आहे, ते माझ्या बाजूने आजही उभे आहेत. माझ्यासमवेत देव आहे.

२. मी कोणत्याही साक्षीदाराला किंवा आरोप करणार्‍यांना धमकावलेले नाही. सर्वांच्या साक्षी झालेल्या आहेत, अशा वेळी धमकावून काय साध्य होणार ?

३. माझे भक्त आणि समर्थक शांततेने मला भेटण्यासाठी अन् पहाण्यासाठी येथे येतात; मात्र पोलीस त्यांना पिटाळून लावतात, त्यांच्यावर लाठीमार करतात आणि पुढे जाऊन त्यांच्यावर गोंधळ घातल्याचा आरोप करतात. (हिंदूंनो, पोलिसांचा हिंदुद्वेष जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

४. मी लवकरच यातून मुक्त होईन. खोटेपणाचा कालावधी वाढला आहे; मात्र सत्याचाच विजय होईल. उपचार न मिळाल्याने या कालावधीत प्रकृती बिघडत रहाते.

५. मी येथे एकटा असलो, तरी मी देवाचे अधिकाधिक ध्यान करत रहातो. तसेच येथे अनेक कैदी असल्याने मी एकटाही नाही. कैदी आणि कारागृहातील कर्मचारीही माझा परिवार आहे.

६. राम जेठमलानी, कपिल सिब्बल, सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्यासमवेत अनेकांनी सुटकेसाठी प्रयत्न केले; मात्र मला आशा आहे की, मला न्याय मिळेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *