ममता (बानो) बॅनर्जी यांचे मुसलमानप्रेम !
निधर्मी राज्यात मुसलमानांसाठी हिंदूंच्या सणांवर नेहमीच निर्बंध घातले जातात, हे हिंदूंना लज्जास्पद ! अशांना निवडून देणार्या हिंदूंना ही मिळालेली शिक्षाच होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोलकाता : बंगालच्या मुख्यमंत्री ममता(बानो) बॅनर्जी यांनी मोहरमनिमित्त मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन दसर्या दिवशी दुपारी ४ च्या आत आणि दुसर्या दिवशी करू नये, असा फतवा काढून हिंदूंच्या धार्मिक परंपरा पायदळी तुडवण्याचे काम केले आहे. हिंदूंचा राग शमवण्यासाठी राज्यातील दुर्गा उत्सव मंडळाला अनुदान देण्याचे गाजर दाखवले आहे.
या वर्षी बंगाल राज्यातील हिंदूंचा दुर्गापूजा हा अत्यंत महत्त्वाचा सण आणि मोहरम एकत्र येत आहेत. दसर्याच्या दिवशीच दुर्गामूर्ती विसर्जन आणि मोहरमचे ताजीये मिरवणुकीने नेण्यात येतील. या वेळी जातीय तणाव निर्माण होऊ नये; म्हणून मुख्यमंत्र्यांनी पोलीस आणि दुर्गा मंडळांचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेऊन दुर्गा विसर्जन दसर्याच्या दिवशी म्हणजे ११ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ४ वाजल्यानंतर करू नये, तसेच १२ ऑक्टोबर या दिवशीही करू नये. ते १३ ऑक्टोबर या दिवशी करावे असे निर्देश दिले. ममता बॅनर्जी यांनी गेल्या वर्षीही असा आदेश दिला होता. (ममता(बानो) बॅनर्जी यांनी अशीच बैठक मुसलमानांची घेऊन त्यांना मोहरमच्या वेळा पालटण्याची विनंती का केली नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हिंदूंच्या रागाचा उद्रेक होऊ नये; म्हणून त्यांना करातून सूट, मंडळांना अनुमती देण्यासाठी एक खिडकी योजना, प्रत्येक जिल्ह्यातील महिला दुर्गा मंडळांना आणि गरीब मंडळांना प्रत्येकी १० सहस्र रुपयांचे अनुदान इत्यादी सवलतींचे गाजर दाखवण्यात आले आहे. तसेच उत्सवात शांती राखण्याचे आवाहन केले आहे. (अशा आवाहनाची आवश्यकता हिंदूंपेक्षा धर्मांधांना अधिक आहे, हे मुख्यमंत्र्यांना कळले पाहिजे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात