Menu Close

हिंदुत्वनिष्ठांचे यश : ओला कॅब्सने श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र हटवले; मात्र क्षमा न मागितल्याने हिंदूंचा विरोध कायम !

नवी देहली : वाहतुकीसाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर करणारे ओला या भारतातील आस्थापनाने त्याच्या ब्लॉगवरील एका पोस्टमध्ये गणेशचतुर्थीला श्री गणेशाची चांदीची मूर्ती तुमच्या घरापर्यंत पोहोचवू असे विज्ञापन केले होते. यात ओला कॅब्सच्या छतावर (रूफ) श्री गणेशाची मूर्ती बसवली असून गणेशचतुर्थीला ओला कॅब्स वरून श्री गणेश घरी येत असल्याचे दाखवण्यात आले होते. धर्माभिमानी हिंदूंनी केलेल्या विरोधानंतर ओलाने हे चित्र ब्लॉगवरून हटवले आहे; मात्र या प्रकरणी क्षमा मागितली नसल्याने धर्माभिमानी हिंदूंनी ओलाचा निषेध चालू ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

धर्माभिमानी हिंदू या विडंबनाचा बेंगळुरू येथील कार्यालयातील पुढील संपर्कावर वैध मार्गाने निषेध करत आहेत.
इमेल : [email protected]
दू.क्र. : ०८० ६७३५०९००
फॅक्स : ०८० ६७३५०९०४

 


ओला कॅब्सकडून करण्यात येणार्‍या श्री गणेशाच्या विडंबनाचा हिंदूंकडून निषेध !

नवी देहली : वाहतुकीसाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर करणारे ओला हे भारतातील एक प्रसिद्ध आस्थापन आहे. ओलाने त्याच्या ब्लॉगवर प्रसारित केलेल्या एका पोस्टमध्ये श्री गणेशचतुर्थीला श्रीगणेशाची चांदीची मूर्ती तुमच्या घरापर्यंत पोचवू, असे विज्ञापन केले आहे. या विज्ञापनामध्ये ओला कॅब्सच्या छतावर (रूफवर) श्रीगणेशाची मूर्ती बसवली असून गणेशचतुर्थीला ओला कॅब्स वरून श्रीगणेश घरी येत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

हिंदु धर्मात श्री गणेश ही उपास्य देवता आहे. हिंदु समाजात श्री गणेशाची भक्तीभावाने पूजा-अर्चा करतात. श्री गणेशाला गाडीच्या छतावर बसवून विज्ञापनासाठी वापर करणे अयोग्य आहे. ओला कॅब्सने स्वत:च्या व्यापारी लाभासाठी हिंदु देवतेचे मानवीकरण केले आहे. श्री गणेशाची ही विटंबना आहे. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर झाला आहे.

हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्‍या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *