स्वतःची अन्वेषण यंत्रणा निर्माण करून राज्यातील प्रशासकीय यंत्रणेवर अविश्वास दाखवणारे अंनिसवाले !
मुंबई : नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी गणेशभक्तांनी अधिकाधिक पर्यायी विसर्जनस्थळांचा वापर करावा, असे आवाहन करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिका यांना सांगितले आहे. त्याचे पालन शासनाकडून होते कि नाही, हे पहाण्यासाठी मुंबईतील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया यांसह पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि विविध प्रमुख जिल्ह्यांत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते श्री गणेशमूर्ती विसर्जनस्थळांवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच विसर्जनाच्या सर्व दिवशी चित्रीकरणही करणार आहेत.
अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी यांना कृत्रिम हौद आणि अन्य पर्याय यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यास सांगितले आहे.
वर्षभर सर्वत्र प्रचंड प्रमाणात प्रदूषित पाणी नैसर्गिक स्रोतात सोडले जात असतांना, तसेच गणेशमूर्तीच्या विसर्जनाने कोणतेही प्रदूषण होत
नसतांना अंनिसवाल्यांची ही गरळओळ म्हणजे निवळ धर्मद्वेषच नव्हे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
गणेशभक्तांना कायद्याची भीती दाखवणारे हिंदुद्वेषी अंनिसवाले !
पाण्याचे नैसर्गिक स्रोत प्रदूषित करणे, हा गुन्हा असल्याची माहितीही भाविकांना द्यायला हवी. यापुढे संबंधित यंत्रणांनीही त्या आदेशाचे पालन करावे अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा भोगण्यासाठी यंत्रणांनी सिद्ध रहावे, अशी चेतावणी अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे. (प्रदूषित पाणी नद्यांमध्ये सोडणार्या कारखान्यांच्या विरोधात अंनिस का लढत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
हिंदूंनो, प्रचंड संख्येने नैसर्गिक स्रोतात मूर्तीविसर्जन करून धर्माचे पालन करा !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात