हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम !
धर्मविरोधी कृतींविरोधात लढत राहिल्याने ईश्वराचा आशीर्वाद मिळून यश मिळत असल्याने धर्मनिष्ठांनी धर्माच्या बाजूने सतत लढत राहिले पाहिजे, हे यावरून लक्षात येईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होते, असा कांगावा करत पुणे महानगरपालिकेने भाविकांना गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेट वापरण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी १० टन बायकार्बोनेटची खरेदीही केली होती; मात्र या धर्मशास्त्रविरोधी निर्णयाचा हिंदु जनजागृती समितीसह शिवसेना, तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, लष्कर-ए-हिंद यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि भाविक यांनी विरोध दर्शवला होता. या प्रकरणी अमोनियम बायकार्बोनेट वापरण्याचा निर्णय पूर्णतः ऐच्छिक असून प्रत्येकाला गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे स्वातंत्र्य आहे. या संदर्भात महानगरपालिका कुणावरही बळजोरी करणार नाही. हा निर्णय प्रत्येकाने स्वेच्छेने घ्यावा, अशी प्रतिक्रिया महापौर प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. (पण मुळात महानगरपालिकेने धर्मशास्त्रविरोधी पर्याय नागरिकांना उपलब्ध करून दिला का ? असे निर्णय घेण्याआधी महानगरपालिकेने धर्माचार्यांचे मार्गदर्शन घेणे अपेक्षित आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात