Menu Close

काश्मीरला भारतीय सैनिकांची स्मशानभूमी बनवण्याची आतंकवादी सय्यद सलाउद्दीन याची धमकी !

काही मूठभर आतंकवाद्यांचा नेता अण्वस्त्रधारी भारताला अशी धमकी देण्याचे धाडस करतो याला कणाहीन सर्वपक्षीय भारतीय राज्यकर्ते उत्तरदायी आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुझफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर) : आत्मघातकी आतंकवादी बनवून येत्या काळात काश्मीर खोर्‍याला भारतीय सैनिकांची स्मशानभूमी बनवून टाकू, अशी धमकी हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख आतंकवादी सय्यद सलाउद्दीन याने दिली आहे.

काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ ४ सप्टेंबरला काश्मीरमध्ये जाण्याच्या पार्श्‍वभूमीवर त्याने ही धमकी दिली होती. काश्मीर प्रश्‍नावर शांततेच्या मार्गाने राजकीय तोडगा काढण्याचा कुठलाही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असेही तो म्हणाला. एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत देतांना ही धमकी दिली. सलाउद्दीन पुढे म्हणाला की, चर्चा वगैरे सगळे थोतांड आहे. आतंकवाद आणि सशस्त्र लढा हाच काश्मीर प्रश्‍न सोडवण्याचा पर्याय आहे. काश्मिरी नेते, जनता आणि मुजाहिदीन यांनी हे ध्यानात ठेवावे. काश्मीर हा वादाचा विषय आहे, हे मान्य केल्याशिवाय चर्चा होऊच शकत नाही. आम्हाला आमची शक्ती दाखवावीच लागेल. हा लढा काश्मीरबाहेरही घेऊन जाऊ.

सलाउद्दीन म्हणाला की, बुरहान वाणी मारला गेल्यामुळे काश्मीरचा लढा निर्णायक टप्प्यात पोचला आहे. संपूर्ण खोरे छळछावणी झाली आहे. हा त्याग व्यर्थ जाणार नाही. भारत सरकार जेवढा बळाचा वापर करील, तेवढा फुटिरांचा निर्धार सशक्त होईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *