पंढरपूर : मी स्वतः ‘मूर्तीदान’ ही संकल्पना मानत नाही. पालिकेचा कोणताही कर्मचारी श्री गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन करण्यात अडथळा आणणार नाही, असे आश्वासन पंढरपूर येथील मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापट यांनी दिले. येथे धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यातच मूर्तीचे विसर्जन करावे, या मागणीसाठी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापट यांना निवेदन देण्यात आले. मागील वर्षी कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या मूर्तीनंतर पाणी नसलेल्या तलावात पुरल्याचे या वेळी निदर्शनास आणून दिले. निवेदन देतांना हिंदू महासभेचे विवेक बेणारे, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक श्री. लक्ष्मण पापरकर, सामाजिक समरसता पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत प्रमुख श्री. रवींद्र साळे, पेशवा युवा मंचचे अध्यक्ष श्री. गणेश लंके आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात